घरदेश-विदेशलग्नाच्या व्हिडिओत फिल्मी गाणी वापरताय? मग सावधान

लग्नाच्या व्हिडिओत फिल्मी गाणी वापरताय? मग सावधान

Subscribe

टी सीरिज कंपनीने त्यांची गाणी लग्नाच्या व्हिडिओ अल्बममध्ये वापरल्याप्रकरणी पंजाब, हरियाणा, झारखंड आणि गुजरातसह अन्य काही राज्यातील सुमारे १०० हून अधिक फोटोग्राफर्सना कॉपीराईट उल्लंघनाची नोटीस पाठवली आहे.

लग्नसोहळा असो किंवा मग एखादा समारंभ त्यामध्ये संगीत नसेल, गाणी नसतील तर त्यात मजाच नाही. गाण्या-बजावण्यामुळे कार्यक्रमाला खरी रंगत येते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, आता जर तुम्ही लग्नामध्ये किंवा समारंभामध्ये अशाचप्रकारे फिल्मी गाणी वाजवण्याच विचार करत असाल तर जरा जपून! कारण यामुळे तुम्हाला नंतर त्याचा त्रास भोगावा लागू शकतो. ‘टी सीरिज’ या म्युझिक कंपनीने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे तुम्ही चांगलेच फसू शकता. टी सीरिजने नुकतीच एक नोटीस पाठवली असून त्यामध्ये लग्नाच्या व्हिडिओत वापरण्यात येणारी गाणी कॉपीराईटचं उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर १०० हून अधिक गुन्हेदेखील कंपनीकडून दाखल करण्यात आले आहेत. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, टी सीरिज कंपनीने त्यांची गाणी लग्नाच्या व्हिडिओ अल्बममध्ये वापरल्याप्रकरणी पंजाब, हरियाणा, झारखंड आणि गुजरातसह अन्य काही राज्यातील सुमारे १०० हून अधिक फोटोग्राफर्सना कॉपीराईट उल्लंघनाची नोटीस पाठवली आहे. याशिवाय हरियाणातील ३० दुकानदारांनाही कंपनीने गेल्या २ महिन्यात नोटीस पाठवली आहे.


वाचा: लग्नात दीपिकाच्या ओढणीवर होता ‘हा’ खास संदेश

परवानगीशिवाय गाणी वापरण्यास मनाई

दरम्यान, टी सीरिज कंपनीने जारी केलेल्या आदेशानुसार यापुढे कुणाला कंपनीची गाणी वापरयाची झाल्यास आधी त्याचा परवाना घ्यावा लागेल. टी सीरिजच्या या कारवाईवर ५० फोटोग्राफर्सनी नाराजी व्यक्त केली असून, गाण्याबाबतचा परवाना मिळवणं तितकसं सोपं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परवाना घेण्यासाठी बरीच मोठी किंमत मोजावी लागेल ज्यामुळे दरही वाढवावे लागतील आणि एकूणच याचा परिणाम व्यवसायावरही होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी असोसिएशन आणि टी सीरिजमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय. लग्नाने व्हिडिओ बनवणाऱ्या दुकानदारांनी आता प्रतिज्ञापत्र घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये आपला अल्बम सोशल मीडियावर शेअर केला जाणार नाही तसंच त्याचा व्यावसायिक वापर केला जाणार नाही असं नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

कंपनीने देशभरातील १०० दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हे दुकानदार विना परवाना गाणी वापरत होते. यापुढे आपल्या व्यवसायासाठी गाण्यांचा वापर करायचा असल्यास कंपनीचा परवाना घेणं अनिवार्य ठरणार आहे – विपीन कुमार, टी सीरिजचे अँटी पायरसी मॅनेजर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -