धक्कादायक! कमोडवर बसताच तरूणाच्या गुप्तांगाला सापाने घेतला चावा

कमोडवर बसणाऱ्या एका १८ वर्षाच्या तरुणाच्या गु्प्तांगाला चावा घेऊन त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

thailand man is bitten on the penis by python while sitting on the toilet
कमोडवर बसताच तरूणाच्या गु्प्तांगाला घेतला चावा; पाहिले तर...

एक तरुण नैसर्गिक विधीसाठी कमोडवर बसला. तो बसताच क्षणी त्या युवकाच्या गुप्तांगाला अचानक चावा घेण्यात आला. त्याने गुप्तांगाकडे पाहिले असता त्याला धक्काच बसला. त्याच्या गुप्तांगाला चक्क सापाने चावा घेतल्याचे त्याने पाहिले आणि त्याठिकाणाहून पळ काढला. ही धक्कादायक घटना थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकपासून १३ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी घडली आहे.

नेमके काय घडले?

बँकॉक याठिकाणी राहणारा तरुण सिराफोप मसुकारत (१८) शौचालया गेला होता. कमोडवर बसलेल्या तरुणाच्या गुप्तांगात अचानक दुखू लागले. त्याने पाहिले असता तो चावा सापाने घेतल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनी तात्काळ आईसोबत बांग येई रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू करत जखमेतून वाहणारे रक्त थांबवले आणि डॉक्टरांनी सिराफोपच्या शिश्नाला तीन टाके मारले. त्याशिवाय सापाच्या विषाचा परिणाम होऊ नये, यासाठी antibiotic ही दिले.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार; ‘साप हा कमोडमध्येच होता. या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलवण्यात आले. त्यानंतर त्या सापाला जंगलात सोडण्यात आले. हा साप जवळपास चार फूट लांबीचा होता. तसेच हा साप आमच्या घरात कसा शिरला? याची माहिती नाही. कदाचित नाल्याच्या माध्यमातून शौचालयात आला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. सापामुळे माझा मुलगा जखमी झाला असल्याची माहिती सिराफोप मसुकारतच्या आईने दिली आहे.


हेही वाचा – जबरदस्त! व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य; मगरीने लावली स्पीडबोटशी रेस