घरदेश-विदेशपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिदायतुल्लाह मलिक या दहशतवाद्याची

पुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिदायतुल्लाह मलिक या दहशतवाद्याची

Subscribe

पुलवामातील स्फोटकांनी भरलेल्या कारचा मालक पुलवामा पोलिसांना सापडला असून त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावलं होतं.

भारतीय जवानांच्या सतर्कतेमुळे काल गुरुवारी पुलवामासारख्या हल्ल्याची घटना टळली होती. पुलवामाजवळ एक सॅन्ट्रो गाडीमध्ये IED (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आलं होतं. पण हे बाँम्ब निकामी करणाऱ्या पथकानं वेळेत हा बॉम्ब निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आता स्फोटकांनी भरलेल्या कारचा मालक पोलिसांना सापडला आहे. हिज्ब दहशतवादी हिदायतुल्लाह मलिक या कारचा मालक आहे. हिज्ब दहशतवादी हिदायतुल्लाह मलिकवर ३ लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. या क्षणी, त्याला पकडण्यासाठी त्याच्या ठिकाणांवर सतत लक्ष ठेवला जात आहे. पुलवामा पोलिसांनीही आज हिदायतुल्लाच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावलं होतं. आतापर्यंत पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. हिदायतुल्लाचा संपूर्ण ताकदीनिशी शोध घेण्यात येत असून कुटुंबातील सदस्यांना यात मदत करण्यास सांगितलं जात आहे.

जैश आणि हिझबच्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा १४ फेब्रुवारी २०१९ प्रमाणे दक्षिण काश्मीरमध्ये मोठा आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचला होता. काल गुरुवारी सकाळी पोलिसांनी गाडी ताब्यात घेत सुरक्षितपणे गाडी नष्ट केली. कारचा उपयोग बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात आलेली कार हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादीची होती. हिदायतुल्ला मलिक असं या दहशतवाद्याचं नाव असून तो जिल्हा शोपियांमधील शरदपोरा गावचा रहिवासी आहे. दरम्यान, आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की ३० जुलै २०१९ रोजी हिदायतुल्ला मलिक दहशतवादी झाला. या वर्षाच्या सुरुवातीला सी श्रेणीतील दहशतवाद्यांमध्ये त्याची नोंद होती. त्याच्यावर तीन लाखांचं बक्षीस आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार


एनआयएच्या पथकाने केली चौकशी

एनआयएने राजपोरा येथील स्फोट झालेल्या जागेचा आढावाही घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी एनआयएकडेदेखील सोपविली जाऊ शकते. IEDमध्ये आरडीएक्सशिवाय अमोनियम नायट्रेट, नायट्रेट ग्लिसरीन आणि सल्फर देखील वापरलं गेलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -