घरटेक-वेकसूर्याचा पाठलाग करणारा 'अजब' रोबो

सूर्याचा पाठलाग करणारा ‘अजब’ रोबो

Subscribe

पाठीवर असलेल्या रोपट्याला सुर्यप्रकाश मिळण्यासाठी सहा पायाचा 'रोबो बल्बसॉर' करतो सुर्याचा पाठलाग

वनस्पतींना जगण्यासाठी पाणी आणि सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते हे आपण लहानपणीच शिकलो होतो. वनस्पतीच्या पानांना सुर्यप्रकाशामुळे अन्न निर्मीती करण्यास मदत होते. मात्र घरात असलेल्या झाडांना अनेकदा पुरेसा सुर्यप्रकाश मिळूशकत नाही. अशा झाडांना पाठीवर घेऊन सुर्यप्रकाशाचा पाठलाग करणाऱ्या रोबो चीनव्दारे तयार करण्यात आला आहे. या रोबोला सहा पाय असून तो एखाद्या स्पायडर प्रमाणे दिसतो. या रोबोला ‘बल्बसॉर रोबो’ असे म्हटलं जात आहे. चीनच्या व्हिनक्रॉस कंपनीने चायनीज रोबोटिक आणि सन टिआँक यांच्या मदतीने हा रोबो तयार करण्यात आला आहे. या रोबोच्या करामाती पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

रोबोची वैशिष्ट्य
हा रोबो एका प्राण्यासारखा दिसत असून त्याला सहा पाय आहेत. रोबोमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यामुळे त्याला बघण्यास मदत होते. पूर्णतः स्वयंचलीत असून रोबोत काही विशेष सेंसर बसवण्यात आली आहेत. यामुळे तुम्ही जर त्याला पकडण्यासाठी आपले हाथ पुढे केलेत तर तो तुमच्या जवळ येईल. हा रोबो मार्करच्या सहाय्याने लिहू ही शकतो. सकाळच्यावेळी हा रोबो घरात येणाऱ्या सुर्यप्रकाशात रोपटे घेऊन जातो. आपल्या पाठीवर लादून हा रोबो रोपट्याला घेऊन जातो. तसेच हा रोबो लोकांच्या संभाषणावर प्रत्युत्तर देऊ शकतो. २०१४ पासून या रोबोच्या निर्मीतीचे काम सुरु होते.

- Advertisement -

कशी आली कल्पना
या रोबोच्या निर्मीतीची कल्पना सुर्यफूलापासून आली आहे. झाडांना जगण्यासाठी सूर्य प्रकाश गरजेचा असल्यामुळे सुर्यफूले सकाळी उमलतात आणि सायंकाळी मावळतात. झाडांना स्थलांतरणाची गरज असते मात्र ते स्थलांतर करु शकत नाहीत. यामुळे अधिक सुर्यप्रकाश किंवा अधिक पाणी मिळाल्यामुळे उन्हाळ्यात झाडांची पाने सुखतात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -