‘पाकिस्तान जितक्या खालच्या थराला जाईल, भारत तितकाच उंच उडेल’

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पुन्हा एकदा कश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. पाकिस्तानच्या अशा प्रकारच्या वागणुकीवरुन संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.

Mumbai
unga syed akbaruddin slams on pakistan
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन

काश्मीरमधील कलम ३७० आणि कलम ३५ ‘अ’ रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला काश्मीर मुद्द्यावरुन एकटे पाडण्याचे बरेच प्रयत्न केले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी काश्मीर तोंडघशी पडला आहे. तरीही पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. पाकिस्तानच्या अशा प्रकारच्या वागणुकीवरुन संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. याशिवाय ‘पाकिस्तान जितक्या खालच्या थराला जाईल, भारत तितकाच उंच उडेल’, असे ते म्हणाले आहेत. न्यूयॉर्क येथील प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

नेमके काय म्हणाले सय्यद अकबरुद्दीन?

‘संयुक्त राष्ट्र संघात प्रत्येक देश स्वत:ला सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, काही देश आपले म्हणणे मांडण्यासाठी खालच्या स्तराला जाऊन आरोप करत असतात. आता देखील एक देश एकाच मुद्द्याची पुनरावृत्ती करुन सहानुभूती मिळवण्यासाठी खालच्या पातळीवर जाईल. मात्र, यामुळे आमचा स्तर आणखी उंचावेल, असा आमचा विश्वास आहे. तुम्ही जितके खालच्या पातळीवर जाल, तितकी मोठी झेप आमची असेल’, अशा स्पष्ट शब्दांमध्ये सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला सुनावले. त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर ‘संयुक्त राष्ट्र संघात द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकीतून भारत कशा प्रकारे उसंडी मारत आहे ते दिसेल’, असेही अकबरुद्दीन म्हणाले.


हेही वाचा – उद्योग जगताला दिलासा देणारी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा