घरट्रेंडिंगमास्क व्यवस्थित घालण्याचा सल्ला दिला म्हणून घेतला चावा!

मास्क व्यवस्थित घालण्याचा सल्ला दिला म्हणून घेतला चावा!

Subscribe

कोरोना व्हायरसच्या संकटात घरातून बाहेर पडताना मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण काही लोक या गोष्टी समजतं नाहीत. ते फक्त दिखाव्यासाठी मास्क घालतं असतात. काही जणांचा मास्क नाकाच्या खाली असतो तर काही जणांची हनुवटीच्या खाली असतो. असे लोक जगभरात आहेत. दरम्यान एका ५६ वर्षीय रॉबर्ट मर्फी एका बसमधून प्रवास करत होता. यावेळेसी या रॉबर्टने त्याच्याबरोबर प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाला मास्क व्यवस्थित घालण्याचा सल्ला दिला. पण त्या प्रवाशांने रागाच्या भरात रॉबर्डलाच्या छातीचा चावाच घेतला आणि त्याला जखमी केले.

ही घटना बेल्जियम मधील आहे. आयर्लंडचा रहिवासी असलेला मर्फी बेल्जियम प्रांतातील मर्कसेम नगरपालिकेत राहतो. या घटनेबाबत मर्फीने सांगितले की, ‘मी फक्त त्या व्यक्तीला नाक व्यवस्थित मास्कने झाकण्यासाठी सांगितले होते.’

- Advertisement -

एडी मीडियानुसार, ज्यावेळी रॉबर्ट बसमध्ये बसला तेव्हा एक व्यक्ती जोरात शिंकला. यावेळी शिंकल्यामुळे पाण्याची छोटे थेंब रॉबर्टच्या डोक्यावर पडले. त्यामुळे रॉबर्टने त्या व्यक्ती शिंकत असताना दुसऱ्या बाजूला तोंड करून शिंका असा सल्ला दिला. यानंतर त्या व्यक्तीने रॉबर्टची माफी मागितली. परंतु काही वेळात बसमध्ये एक कपल चढले आणि रॉबर्टचा समोर येऊन बसले.

या कपलचे मास्क हनुवटीच्या खाली होते. त्यामुळे रॉबर्टने त्यांना नाक आणि तोंड व्यवस्थित झाकण्यासाठी मास्क नीट घालण्याचा सल्ला दिला. पण त्यावेळेस त्या व्यक्तीने मनाई केली आणि रॉबर्टवर हल्ला केला. रॉबर्टने सांगितले की, ‘मी हल्लयातून मला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्याकडून काही शक्य झालं नाही. त्याने माझ्या छातीचा चावा घेतला. त्यावेळेस मला विश्वास बसेना. परंतु तो एक पिसाळलेला कुत्रासारखा होता. मी त्याला दूर ढकलं पण तो मला सोडण्यास तयार नव्हता. तो मला सतत चावण्याचा प्रयत्न करत होता. नशीब त्यावेळेस इतर बस प्रवाशांनी त्याला माझ्यापासून दूर नेले.’ या घटनेप्रकरणी बेल्जियम पोलिसांनी या ३८ वर्षीय व्यक्तीला त्यांचा पार्टनरसह अटक केली आहे. सध्या रॉबर्ट मर्फीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – तरुणाच्या ‘जीन्स’मध्ये घुसला ‘विषारी साप’ अन्….!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -