घरदेश-विदेशवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड लांबणीवर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड लांबणीवर

Subscribe

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची उद्या निवड होणार होती.

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड उद्या शुक्रवारी करण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव भारतीय संघाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या शनिवारी किंवा रविवारी निवड समितीची बैठक होणार असूत या बैठकीत संघाची निवड होण्याची शक्यता आहे.

धोनीच्या निवृत्तीची चर्चा

दरम्यान विश्व चषक २०१९ साठी इंग्लंडमध्ये गेलेले भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज भारतात परतले. या मालिकेमध्ये हे दोन खेळाडू खेळणार की त्यांना विश्रांती हवी आहे. हे जाणून घेण्यासाठी संघ निवड पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. तर निवड समितीला धोनीबरोबर त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा करायची असल्याने संघ निवडीची बैठक काही दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

अधिकाऱ्यांनी दिले तांत्रिक अडचणींचे कारण

बीसीसीआय, क्रिकेट प्रशासकीय समिती आणि अन्य काही पदाधिकाऱ्यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केल्याने निवड समितीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.

या दिवशी होणार संघ निवड

दरम्यान उद्या होणारी निवड समितीची बैठक आता शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत संघ निवडीचा निर्णय होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही जणांच्या मते सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्धचा भारतीय संघ जाहीर होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -