‘प्रेमनगरी’ आग्र्यात खळबळ! पत्नीला प्रियकरासह रंगेहात पकडलं; पतीनं चपलेनं थोबडवलं

पतीने नुसतीच मारहाण केली नाही तर या प्रकाराचा व्हिडिओ करून त्याने तो सोशल मीडियावर व्हायरल केला

प्रातिनिधीक फोटो
Advertisement

‘प्रेमनगरी’ असलेल्या आग्रा येथे पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासह हॉटेलमध्ये रंगेहात पकडले. हॉटेलच्या खोलीत दुसऱ्या तरुणासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर राग आनावर झालेल्या पतीने आपल्या पत्नीला चपलेने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीने नुसतीच मारहाण केली नाही तर या प्रकाराचा व्हिडिओ करून त्याने तो सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमधील असल्याचे सांगितले जात आहे. याच परिसरात राहणारी महिला या हॉटेलमध्ये तिच्या प्रियकरासोबत आली होती. या हॉटेलात ओळखपत्राविना खोली मिळत असल्याने ही महिला या हॉटेलच्या खोलीत प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पकडली गेली. तिचा पती काही साथीदारांसोबत तिथे आला होता. यावेळी त्याने तरुणाला आणि पत्नीला चांगलाच चोप दिला. तसेच पत्नीला चपलेने मारतानाचा व्हिडिओ देखील तयार केला.

पती मारहाण करत असताना पत्नीही त्याच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आग्र्यामधील पर्यटन उद्योग संकटात आले आहे. त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक हॉटेल किंवा फार्म हाऊस इतर व्यक्तींना भाडेतत्वावर देत आहेत. भाडेतत्वावर घेतल्यानंतर काही जण हॉटेलमधील खोल्या वेश्याव्यवसाय आणि इतर अवैध कामांसाठी देत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.


अधिकाऱ्याचं बिंग फुटलं! Corona चं कारण देत घरी जाणं टाळलं; पत्नीनं प्रेयसीसह रंगेहात पकडलं