घरदेश-विदेशमुंबई लोकलमधून मोदी फिरणार का?

मुंबई लोकलमधून मोदी फिरणार का?

Subscribe

मनसेचे मोदींना लोकल प्रवासाचे चॅलेंज

काही दिवसांपूर्वी देशाचे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावर फिटनेस चॅलेंजची चळवळ उभी केली. त्यांनी स्वतः व्यायाम करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ‘हम फिट तो इंडिया फिट’ असा संदेश दिला होता. त्यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, हृतीक रोशन यांना फिटनेस चॅलेंज दिले. त्यांच्या या आव्हानानंतर देशातल्या अनेक राजकीय नेते आणि अभिनेत्यांनी आपापले व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केले. परंतु आता यामध्ये मनसेने सहभाग घेतला असून पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर स्वत:चा मुंबई लोकलने प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबई लोकलने प्रवास करण्याचे आव्हान दिले आहे.

मुंबईत लोकलमध्ये तुफान गर्दी असते आणि त्यामुळे प्रवासादरम्यान अनेक अडचनींना प्रवाशांना सामोरे जावे लागते. अश्या परिस्थितीमध्ये मुंबईकर लोकलमधून धक्के खात प्रवास करतो. त्यामुळे तो दररोज हे चॅलेंज पूर्ण करतो. मुंबईकरांचे हे फिटनेस चॅलेंज पंतप्रधानांनी स्वीकारावे, असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ अतिशय मजेशीर पद्धतीने बनवलेला आहे. त्यामुळे लोकांकडून या व्हिडिओचे कौतुकदेखील केले जात आहे.

- Advertisement -

विराट कोहलीने दिलेले चॅलेंज मोदींनी स्वीकारल्यांनतर अनेक नेत्यांनाही मोदींना आपले फिटनेस चॅलेंज स्वीकारावे म्हणून स्वतःचे फिटनेस चॅलेंज देणारे विडिओ बनवायला सुरुवात केली यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीसुद्धा फिटनेस चॅलेंजच्या या ट्रेंडमध्ये सहभाग नोंदवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -