घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टशिवसेनेचा प्रचार करण्यास योगींचा नकार ?

शिवसेनेचा प्रचार करण्यास योगींचा नकार ?

Subscribe

जाहीर सभा रद्द

शिवसेनेचा प्रचार करण्यास नकार दिल्यामुळे योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा रद्द झाल्याची चर्चा केली जात असून आता त्याच ठिकाणी त्याचवेळी त्यांच्या जागी गृहमंत्री राजनाथ सिंह सभा घेणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले होते. त्यावेळी या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात एकमेकांवर टीका केली होती. योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे यांनी त्या निवडणुकीत एकाच दिवशी एकाचवेळी जाहीर सभा घेऊन शक्ती प्रदर्शनही केले होते. योगींनी आपल्या सभेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना चपला काढल्या नव्हत्या. या प्रकारावर उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली होती. तर ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, बाळासाहेब समाजकारण जास्त आणि राजकारण कमी करत होते. आताची शिवसेना फक्त राजकारण करीत असल्याची टीका योगींनी त्यावेळी केली होती.

यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर भाजपचे खासदार राजेंद्र गावित आता शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपने गावित यांचा प्रचार करण्यासाठी जोर लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरारमध्ये रविवारी जाहीर सभा झाली. तर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची जाहीर सभा नालासोपार्‍यात होणार आहे.राजनाथ सिंह घेणारी सभा यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घेणार होते. 19 ला त्यांची पहिली सभा होणार होती. ती रद्द करून 21 ला ठेवण्यात आली. ती ही रद्द करून 24 एप्रिलला ठेवण्यात आली. मात्र,24 तारखेलाही योगी उपलब्ध होणार नाहीत.

- Advertisement -

पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचार केल्यानंतर आता शिवसेनेचा प्रचार कसा करायचा या विवंचनेमुळे योगी यांनी नकार दिल्याची चर्चा केली जात आहे. मात्र ही चर्चा निरर्थक असून, योगी प्रचारासाठी येणार होते. मात्र,त्यांच्या तारखा जुळत नव्हत्या. जितक्या वेळेत त्यांची महाराष्ट्रात एक सभा होते. तितक्या वेळेत उत्तरप्रदेशात त्यांच्या तीन सभा होतात. त्यामुळे त्यांची सभा रद्द झाली असून त्यांच्या जागी, नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रलपार्क मैदानात राजनाथ सिंह यांची जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -