प्रमोद जाधव यांच्या घरी ४५ वर्षांची परंपरा

New Mumbai
pramod jadhav celebrate eco friendly ganeshotsav at home
प्रमोद जाधव यांच्या घरी ४५ वर्षांची परंपरा

पनवेलच्या खांदा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले प्रमोद जाधव यांचे गणेशोत्सवाचे हे ४५वे वर्ष आहे. जाधव दरवर्षी इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरी करतात. यावर्षी देखील त्यांनी इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरी करण्याचे ठरवले. यावर्षीही त्यांनी शाडोच्या मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. यासोबतच सजावटीसाठी त्यांनी लाकडी पट्टी आणि कागदी फुलांचा उपयोग केला आहे. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि जागृती व्हावी, या उद्देशाने ते इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी करतात, अशी माहिती जाधव यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here