घरताज्या घडामोडीअभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

Subscribe

प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकार, निर्माते करणार पक्षप्रवेश.

अभिनेत्री प्रिया लक्ष्मण बेर्डे ७ जूलैला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत निसर्ग येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. केवळ प्रिया बेर्डे यांच्याबरोबर अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडेकर, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलंद अष्टेकर सर्वजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांच्या अडचणी मी सोडवू शकते. पुणे शहर हे मला फार महत्त्वाचे वाटते. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचे कामही पुण्यात चालते, माझे ह़ॉटेलही पुण्यातच आहे. त्याचबरोबर माझ्या मुलांचे शिक्षणही पुण्यातच झाले आहे. त्यामुळेच हा शहरातून मी माझ्या नवीन कारकीर्दीला सुरूवात करणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरणार आहे. असे प्रिया बेर्डे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, यापुढे मला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रश्न सोडवण्याचे माझे प्रयत्न असतील. कोरोनाच्या या काळानंतर कोणत्या गोष्टी आपण करू शकतो याकडे मी लक्ष देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.


हे ही वाचा – मिकाने घेतली भूषण कुमारची बाजू, सोनूला चांगलेच सुनावले!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -