घरमनोरंजनजामीन मिळताच सोडलं मौन, आलोकनाथ म्हणाले...

जामीन मिळताच सोडलं मौन, आलोकनाथ म्हणाले…

Subscribe

मीटू प्रकरणातील विविध आरोपांनंतर न्यायालयाने अखेर जामीन दिल्यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया बॉलीवूडच्या या संस्कारी बाबूंनी दिली आहे.

‘मी टू’ मोहिमेंतर्गत बॉलीवूडचे संस्कारी बाबू आलोकनाथ यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला होता. मागील काही काळापासून हे प्रकरण चांगलच गाजत होतं. मात्र, अखेर आलोकनाथ यांना मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी जामीन दिला. ५ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर आलोकनाथ यांना जामीन देण्यात आला. लेखिका आणि निर्माती विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपाची गंभीरतेने दखल घेत मुंबई पोलिसांकडून २१ नोव्हेंबर २०१८ ला आलोकनाथ यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून धगधगत असलेल्या या प्रकरणामध्ये आलोकनाथ यांना जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, जामीन मंजूर होताच आलोकनाथ यांनी पाळलेलें मौन व्रत सोडलं आहे. मीटू प्रकरणातील विविध आरोपांनंतर न्यायालयाने अखेर जामीन दिल्यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया बॉलीवूडच्या या संस्कारी बाबूंनी दिली आहे.

आलोकनाथ म्हणाले… 

”जामीन मंजूर झाल्यामुळे मला हायसं वाटत आहे. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने तसंच माझ्या वकिलाने मला शांत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मी गेल्या तीन महिन्यांपासून मौन व्रत धारण केले होते. माझ्या तोंडातून रागाच्या किंवा नैराश्येच्या भरात माझ्या तोंडातून कोणतेही चुकीचे वा अपमानास्पद शब्द बाहेर येऊ नयेत, यासाठी मी गप्प होतो. मला मिळालेल्या जामिनाप्रकरणी मी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. मला अटकपूर्व जामीन मिळाला असून मी न्यायालयाचा मनापासून आभारी आहे. मात्र, याविषयी मी लवकरच बोलेन, माझी बाजू सर्वांसमोर मांडेन”.

- Advertisement -

विनता नंदा यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आलोकनाथ यांचे नाव नव्हते घेतले. मात्र त्यांनी असे म्हटले होते की, बलात्कार करणारी व्यक्ती अभिनय क्षेत्रातील ‘सर्वात संस्कारी व्यक्ती’ आहे. त्यानंतर विनता यांनी आलोकनाथ यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात २१ नोव्हेंबरला तक्रार दाखल केली होती. आलोकनाथ यांच्या वकिलांनी २३ डिसेंबरला न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. याचाच सुनवाणीवर अखेर त्यांना जामीन देण्यात आला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -