घरमनोरंजनGoogle Doodleची मोगँबो अमरीश पुरी यांना अनोखी मानवंदना!

Google Doodleची मोगँबो अमरीश पुरी यांना अनोखी मानवंदना!

Subscribe

अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटांवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याला गूगलने आज आपले डूडल साकारत अनोख्याप्रकारे मानवंदना

नायकापासून खलनायकाची भूमिका साकारणारा मशहूर अभिनेता अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून रोजी झाला होता. अमरीश पुरी हे नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी मानले जाणारा एक बॉलिवूडचा चेहरा. अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटांवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याला गूगलने आज आपले डूडल साकारत अनोख्याप्रकारे मानवंदना दिली आहे.

आपल्या अभिनयाशैलीने लाखो मनावर भुरळ

अमरीश पुरीने मिस्टर इंडिया, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, घातक, दामिनी, करण-अर्जुन या चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्याच्या भूमिकेत होते. मिस्टर इंडिया, नगीना, नायक, दामिनी, कोयला या चित्रपटात दमदार अभिनय करून मोगॅम्बो खुश हुवा! असा डायलॉग ऐकला की अमरीश यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. लाखो मनावर भुरळ पाडली. त्यांच्या काही व्यक्तिकेखा आजही तेवढ्याच स्मरणात आहेत. अमरीश पुरींचा जन्म २२ जून १९३२ ला पंजाब राज्यातील जालंधरमध्ये झाला. १९६७ मध्ये त्यांचा पहिला मराठी चित्रपट ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ प्रदर्शित झाला होता.

- Advertisement -

साधारण ४०० चित्रपटात काम

अमरिश पुरीने आपल्या ३५ वर्षाच्या करिअरमध्ये साधारण ४०० चित्रपटामध्य़े काम केले. त्यांच्या प्रत्येक भूमिकेतील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्याच्या हृदयात स्थान तर निर्माण केले परंतु, खलनायकांच्या भूमिकेमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. कारण नकारात्मक भूमिका साकारत असताना देखील ते त्या भूमिकेसाठी जीव ओतून अभिनय करायचे. अमरीश पुरीच्या व्यक्तिरेखांमधील सर्वात प्रसिद्ध झालेली व्यक्तिरेखा म्हणजे‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘मोगँबो ’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -