घरमनोरंजन'या' प्रश्नामुळे KBC चा स्पर्धक ७ कोटी जिंकू शकला नाही!

‘या’ प्रश्नामुळे KBC चा स्पर्धक ७ कोटी जिंकू शकला नाही!

Subscribe

कौन बनेगा करोडपतीच्या शोमधून आणखी एका स्पर्धकाचे ७ कोटी हुकले आहेत. हे पर्व सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ४ स्पर्धकांचे करोडपतीचे स्वप्न पुर्ण झाले आहे. नुकतेच बिहारच्या अजित कुमार यांचे ७ कोटी रूपये हुकले होते. १ कोटी रूपय जिंकलेल्या अजीत कुमार यांना ७ कोटीचा जॅकपॉट प्रश्न विचारण्यात आला, पण त्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्याने त्यांनी खेळ सोडला आणि १ कोटी रूपये जिंकले.

- Advertisement -

अजित कुमार यांना शेवटच्या प्रश्नासाठी क्रिकेटसंबंधी प्रश्न विचारला होता. “एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघाबरोबर दोन टी २० अर्धशतके ठोकणारा पहिला फलंदाज कोण?”, असा प्रश्न अजीत यांना ७ कोटींसाठी विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी नवरोझ मंगल, मोहम्मद हफीज, मोहम्मद शेहझाद आणि शाकिब-अल-हसन असे चार पर्याय देण्यात आले होते.मात्र क्रिकेटच्या या प्रश्नाबाबत माहिती नसल्याने त्यांना १ कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले. या प्रश्नाचे योग्य उत्तर मोहम्मद शहझाद असे आहे.

२० जानेवारी २०१७ या दिवशी अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहझादने हा पराक्रम केला. त्याने या एकाच दिवसात दोन अर्धशतके केली. ओमान आणि आयर्लंड अशा दोन संघांविरूद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली. आधी त्याने ओमानविरूद्ध ८० धावा केल्या. त्यानंतर त्याच दिवशी त्याने आयर्लंडविरूद्ध नाबाद ५२ धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -