मेघा धाडे बिग बॉसच्या घरातून बाहेर

हिंदी बिग बॉसमधून मेघा धाडे हिच्यावर घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे.

Mumbai
big boss 12 : megha dhade is eliminated from big boss house
हिंदी बिग बॉसमधून मेघा धाडे घराबाहेर

मनोरंजनाचा तिसरा डोळा अर्थात मराठी बिग बॉसच्या पहिलं पार पडलं. या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर हिंदी बिग बॉसमध्ये बारव्या पर्वात दमदार एन्ट्री घेतली आहे. मात्र या आठवड्यात मेघा बिग बॉस १२ मधून अलिमनेट झाली आहे. फिनालेला अवघे काही दिवस उरले असताना मेघा पर्वातून आऊट झाली असल्याचे समोर आले आहे.

मेघाची वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री

मेघाने वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री करत ३६ व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला होता. मात्र हिंदीच्या फिनालेपर्यंत न पोहचताचतीने घरातून एक्झीट घेतली आहे. गेल्या आठवड्यात हिंदी बिग बॉसच्या होस्ट सलमान खानने एलिमिनेशन म्हणत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली खरी पण या आठवड्यात दोन स्पर्धकांना घराबाहेर जावे लागले. या आठवड्यात जसलीन मथूर आणि मेघा धाडे यांना घरातून बाहेर पडावे लागले. मराठी बिग बॉसच्या पहिल्याच पर्वाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यामनाने हिंदी बिग बॉसच्या १२ व्या पर्वाला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. तर हिंदीच्या ११ व्या सिझनचे शिल्पा शिंदेने विजेतेपद पटकावले होते. या वर्षी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. मात्र महिनाभराच्या आतच तिला बिग बॉसच्या घराला राम राम करावा लागला. बिग बॉसच्या १२ व्या सिझनला वेगळ्या जोड्या ही थीम होती. यात गुरू- शिष्य, मित्र-मैत्रिणी अशा जोड्यांचा समावेश होता. यात अनुप जलोटा- जसलीन मथूर यांच अफेअर चांगलच गाजलं.

यामुळे चर्चेत आली मेघा

– मेघा तिच्या रोखठोक बोलण्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात चर्चेत आली. मेघाने कमी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरु केली.
– मेघा ‘कसोटी जिंदगी की’ या मलिकेमध्ये ती झळकली होती. या मलिकेनंतर ती घराघरात पोहचली. या मालिकेप्रमाणेच ती अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये झळकली.
– मेघाने अभिनयाबरोबर स्वयंपाक करणे आणि गाणी म्हणण्याची विशेष आवड असताना ‘बिग बॉस’च्या घरात दिसून आली होती.

या कारणांमुळे बिग बॉसच्या घरात मेघा प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करू शकते असे दिसून आले आहे.


वाचा – मेघा धाडेचा बिग बॉस हाऊसमध्ये धिंगाणा!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here