घरट्रेंडिंगb'day विशेष: टॉप २० रजनीकांत जोक्स

b’day विशेष: टॉप २० रजनीकांत जोक्स

Subscribe

चित्रपटातील रजनीकांत यांच्या भन्नाट स्टाईलमुळे आजपर्यंत त्यांच्यावर शेकडो जोक्स बनले आहेत.

चित्रपटसृष्टीतील ‘थलईवा’ रजनीकांच यांचा आज ६८ वा वाढदिवस. रजनीकांत याच्या देशभरातील चाहत्यांनी आपल्या लाडक्या थलाईवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकच सपाटा लावला होता. संपूर्ण देशातील रजनी फॅन्समध्ये दिवसभर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. शेकडो लोकांनी आपआपल्यापरीने रजनीकांत यांना बर्थडेसाठी शुभेच्छा दिल्या. कुणी त्यांच्या पोस्टरला हार घालत तर कुणी त्यांचा फोटो शरीररावर रंगवून घेत रजनीकांत यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. दरम्यान, रजनीकांत म्हटलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात ते त्यांचे भन्नाट अॅक्शन सीन्स आणि त्यांची आगळी-वेगळी स्टाईल. भींतीवर आपटून अक्रोड फोडणं असो किंवा कदम स्टाईलमध्ये सिगारेट पेटवणं  असो नाहीतर एका हाताने गॉगल डोळ्यावर चढवणं असो, रजनी यांनी प्रत्येक चित्रपटात त्यांच्या भन्नाट स्टाईलची छाप पाडली आहे. त्यांची ही स्टाईल देशाबाहेरील लोकांमध्येही तितकीच फेमस आहे. मात्र, रजनी यांच्या याच थलईवा अंदाजामुळे आजपर्यंत त्यांच्यावर शेकडो जोक्सही बनले आहेत. खास वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकूया, रजनीकांत यांच्यावर बनलेल्या काही फेमस जोक्सवर…

१. एकदा रजनीकांत यांनी एका कुपोषित मुलाला रक्त दिले. तो मुलगा पुढे जाऊन ‘खली’ बनला.

२. रजनीकांत यांच्या घरी खुद्द ‘मादम तुसाद’ यांचा मेणाचा पुतळा आहे

३. मिसकॉलवर एक तास कुणी बोलू शकतो तर तो फक्त रजनीकांत

४. रजनीकांत यांनी एकदा घोड्याच्या पायावर पाय दिला नंतर त्या घोड्याचा जिराफ झाला

५. ज्यावेळी टेलिफोनचा शोध लाववा गेला, तेव्हा त्यावर रजनीकांतचे ३ मिस्डकॉल्स होते

६. एकदा रजनीकांतने चार हत्ती, चार ऊंट, चार घोडे पाळले आणि दोन देशांच्या लष्कराकडून काही सैनिक मागवून घेतले. कारण त्याला बुद्धिबळाचा डाव खेळायचा होता.

७. रजनीकांतने आपला फोन चार्जिंगला लावला की चेन्नईमधील लाईट्स जातात.

८. दिवाळीमध्ये रजनीकांत पेटलेल्या फटाक्याने उदबत्ती पेटवतात

९. रजनीकांत यांनी पेटती सिगारेट फेकल्यामुळे एका ग्रहाला आग लागली. आज त्या ग्रहाला सूर्य ग्रह म्हणून ओळखलं जातं

१०. रजनीकांतना कुठे चालत जावं लागलं तर ते एकाच जागी उभं राहून पायाने पृथ्वी पुढे ढकलतात 

११. रजनीकांत जेव्हा कांदा कापतात तेव्हा कांदाही रडतो

१२. इजिप्तमधील पिरॅमिड हे रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.

१३. रजनीकांत घड्याळ वापरत नाही, केव्हा किती वाजले पाहिजेत याचा निर्णय तोच घेतो

१४.  अ – रजनीकांत एका ओव्हरमध्ये ८ सिक्स मारतो.
      ब – पण ओव्हरमध्ये सहाच बॉल असतात ना ?
      अ – रजनीकांतच्या हातातली बॅट पाहून दोन नोबॉल पडतात

१५. रजनीकांत मॅकडोनाल्डमध्ये जाऊन इडली-सांभार खातात

१६. एकदा देव आणि रजनीकांत यांच्यात लढाई झाली. परिणाम- आज देव ढगात आहे

१७. रजीकांतला एकदा कांजीण्या (चिकनपॉक्स) झाल्या, आज हा विकार पृथ्वीवरुनच गायब झाला आहे

१८. स्पायडरमॅन कधी भारतात नाही येऊ शकत, नाहीतर रजनीकांत त्याला बेगॉनने मारतील 

१९. जेव्हा तुम्ही म्हणता ‘या जगात कोणची परफेक्ट नाही’, तेव्हा तुम्ही रजनीकांतचा अपमान करता

२०. बायकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे फक्त रजनीकांत ओळखू शकतो

- Advertisement -


वाचा: जेजुरीचा खंडोबा ‘रजनीकांत’चे कुलदैवत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -