घरमनोरंजनबर्थडे विशेष: जेजुरीचा खंडोबा 'रजनीकांत'चे कुलदैवत

बर्थडे विशेष: जेजुरीचा खंडोबा ‘रजनीकांत’चे कुलदैवत

Subscribe

रजनीकांत यांचा शिवाजी राव गायकवाड ते रजनीकांत बनण्यापर्यंतचा प्रवास खूप मोठा आणि कष्टाने भरलेला होता.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त आज देशभरातील चाहते आनंद व्यक्त करत आहेत. रजनीकांत हे मूळचे मराठी आहेत हे तर आपण जाणतोच. त्याचा जन्म झाला. रजनीकांतचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे. दरम्यान, मूळ महाराष्ट्राचे असलेल्या रजनीकांत यांचं कुलदैवतही महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रातील अनेकांचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा हे रजनीकांतचे कुलदैवत आहे. एका खासगी मुलाखतीत स्वत: रजनीकांत यांनी याविषयी उल्लेख केला होता. दरम्यान, कामाच्या व्यापात एवढ्या लांब जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी यायला जमत नसल्याची खंतही त्यांनी मुलाखतीमध्ये व्यक्त केली होती.

वाचा: रजनीकांत सिगारेट स्टाईल ‘या’ अभिनेत्याकडून शिकला

कष्टातून उभारलं साम्राज्य

अशी मिळाली पहिली संधी…

रजनीकांत यांचे प्राथमिक शिक्षण कन्नड शाळेत झाले. शाळेत असताना त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलची विशेष आवड होती. त्यांच्या भावाने त्यांना रामकृष्णमिशनच्या शाळेत घातल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी अध्यात्माची आवड जडली. वेद,शास्त्रे, पुराणे यांचा अभ्यास त्यांना केला. मठात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. एकदा त्यांना महाभारतावरील आधारीत नाटकात एकलव्याचे काम करण्याची संधी मिळाली.


वाचा: अशी झाली रजनीकांतच्या अभिनयाला सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -