राज्यात वाढीव बिलाचा झटका सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींना देखील बसला आहे. अव्वाच्या सव्वा वीज बिल पाहून अभिनेत्री तापसी पन्नी, रेणूका शहाणे, सोहा अली खान, राज कुंद्रा आणि हुमा कुरेशी यांसारख्या सेलिब्रिटींना शॉकच बसला. आता ‘सर्किट’ अर्थात अभिनेता अर्शद वारसीला देखील वीज बिल पाहून मोठा शॉक बसला आहे. अर्शदने एक लाखाहून अधिक वीज बिल आल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते. आता अर्शदने अदानीचे वीज बिल भरण्यासाठी लोकांना त्याचे पेंटिंग खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. त्याने ट्विट करून लोकांना हे आवाहन केले आहे.
अर्शद वारसीने बॉम्बे टाईम्स या वृत्तपत्रात छापलेल्या मुलाखतीचा फोटो ट्विटसोबत जोडून लिहिले आहे की, ‘कृपया लोकांनी माझे पेंटिंग खरेदी करा. मला अदानीचे वीज बिल भरायचे आहे. मला पुढच्या बिलासाठी माझी किडनीला ठेवावी लागले.’ सध्या सोशल मीडियावर अर्शदचे हे ट्विट व्हायरल होत आहे असून लोकं या ट्विटला चांगलाचं प्रतिसाद देत आहेत.
Thank you Rachana & @bombaytimes for the article. People please buy my paintings, I need to pay my Adani electric bill, kidneys am keeping for the next bill ?? pic.twitter.com/ycAaSgxGnR
— Arshad Warsi (@ArshadWarsi) July 5, 2020
अर्शदच्या या ट्विटवर एका युजरने अशी प्रतिक्रिया दिली की, ‘मला तुमचे पेंटिंग खरेदी करण्यासाठी माझी किडनी ठेवावी लागेल.’ अर्शदने याला हसत प्रतिसाद देत हे ट्विट रिट्विट केले आहे.
????? https://t.co/18Dnwt7Yme
— Arshad Warsi (@ArshadWarsi) July 5, 2020
पहिल्यांदा अर्शदने वीज बिलाचे ट्विट करताना अदानींवर निशाणा साधला होता. पण त्याने काही वेळाने अदानी इलेक्ट्रिसिटीकडून दखल घेतल्यानंतर ट्विट डिलीट केले.
हेही वाचा – ती पुन्हा येणार! मालिकेत आधीच्या शनायाची पुन्हा एन्ट्री!