Coronavirus: बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह!

Mumbai
boney kapoor two house more staff member found corona positive
Coronavirus: बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह!

देशात कोरोना विषाणू फैलाव वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या आकडा १ लाख १८ हजारहून अधिक आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी लोकप्रिय चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील एका २३ वर्षी नोकराला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. यानंतर आता बोनी कपूरच्या घरी आणखीन दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

बॉम्बे टाईम्सच्या वृत्तानुसार, बोनी कपूर यांच्या घरातील नोकराला कोरोनाची लागण झाल्यानंतर घरातील सदस्यांची आणि कर्मचाऱ्यांची तपासणी केली गेली. त्यामध्ये आणखी दोन घरातील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू लागण झाल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित सदस्य आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

दरम्यान मंगळवारी बोनी कपूर यांनी यांसदर्भात एक मेसेज शेअर केला होता. त्यामध्ये ते म्हणाले की, आमच्या घरातील २३ वर्षीय नोकर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शनिवारी पासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती त्यामुळे त्याला चाचणी करण्यासाठी पाठविले आणि आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.

पुढे ते म्हणाले की, मी, माझी मुलं आणि आमचे सर्व स्टाफ सुखरूप आहोत आणि आमच्यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत. लॉकडाऊन जारी झाल्यापासून आम्ही घर सोडले नाही आहे. पुढील १४ दिवसांसाठी आम्ही सर्व क्वारंटाईनमध्ये आहोत. महापालिकेद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आम्ही सर्व पालन करत आहेत. महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेचे आम्ही आभारी आहोत.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन मीटर अंतर पुरेसे नाही!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here