घरताज्या घडामोडीराम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा दिल्या म्हणून हसीन जहांला आली बलात्काराची धमकी!

राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा दिल्या म्हणून हसीन जहांला आली बलात्काराची धमकी!

Subscribe

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां हे दोघे बऱ्याच काळापासून विभक्त रहात आहेत. मात्र ती नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते. त्यामुळे आपले बोल्ड फोटो शूट, व्हिडिओमुळे सोशल मीडियावर कायम ती चर्चेचा विषय ठरते. आता तीच्या आणखी एका स्टेटमेंटमुळे तीने वाद ओढावून घेतला आहे.

- Advertisement -

बुधवारी आयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावर हसीन जहांने एक पोस्टर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. हसीन जहांने शेअर केलेल्या फोटोत प्रभू श्रीरामा आणि राम मंदिराचा फोटो दिसत आहे. हा फोटो शेअर करत हसीनने राम मंदिर भूमीपुजनासाठी सर्व हिंदू समाजाला शुभेच्छा असे कॅप्शन दिलं आहे. असे केल्याने ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असून कट्टरपंथी चाहत्यांनी तिला बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

- Advertisement -

क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची बायको हसीन जहां २०१८ पासून वेगळे रहात आहेत. कारण २०१८ मध्ये हसीन जहांने आपल्या क्रिकेटर पतीवर म्हणजेच शमीवर आरोप लावले होते. शमीचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध आहेत असा आरोप तीने केला होता. हसीनाने फेसबुकवर काही स्क्रीन शॉट शेअर केले होते, आणि तीचं म्हणणं होतं की, मोहम्मद शमीचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध आहेत. मात्र शमीने या आरोपात कोणतही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -