घरमनोरंजनआता हॉटेलमध्ये मिळणार 'हाऊज द जोश' पदार्थ!

आता हॉटेलमध्ये मिळणार ‘हाऊज द जोश’ पदार्थ!

Subscribe

अभिनेता विकी कौशलचा एक डायलॉग खूप फेमस झाला. हा डायलॉग ‘हाऊज द जोश’. विकीच्या फेमस उरी या चित्रपटातील हा डायलॉग सगळ्यांनाच उर्जा देऊन गेला. या चित्रपटातील विकीच्या कामाचे खूप कौतूकही झाले. २०१८ च्या जानेवारीत प्रदर्शित झालेल्या उरी चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसची गणितं बदलली. या चित्रीपटासाठी विकीला अनेक पुरस्कारही मिळाले.

- Advertisement -

पण या चित्रपटातील ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग खूप गाजला. ‘हाऊज द जोश’ म्हटल्यावर हाय सर अपुसकच प्रेक्षकांच्या तोंडातून येऊ लागलं. हा डायलॉग प्रत्येकाच्या तोंडात बसला आहे. आता या फेमस डायलॉगची रेसिपी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच एका हॉटेलमध्ये एका पदार्थाला ‘हाऊज द जोश’ हे नाव देण्यात आले आहे.

खुद्द विकीनेच हा फोटो सोशलमिडीयावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना विकीने उरी च्या टीम ला टॅग केले आहे. आता हाऊज द जोश ही डीश आहे असे कॅप्शन दिले आहे. या आधी विकीचा हा डायलॉग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना वापरला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -