घरमनोरंजनहृतिक रोशन यंदाच्या 'दादासाहेब फाळके' पुरस्काराचा मानकरी!

हृतिक रोशन यंदाच्या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराचा मानकरी!

Subscribe

गुरूवारी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2020 ची घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात अभिनेता हृतिक रोशनला त्याच्या 'सुपर 30' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

चित्रपटसृष्टीतील पुरस्कारांमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार अतिशय मानाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराची सुरूवात १९६९ मध्ये झाली होती. दरवर्षी भारत सरकारकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. गुरूवारी मुंबईत हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेता हृतिक रोशनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. चित्रपट आणि टेलिव्हिजनसाठी प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

‘सुपर 30’ सर्वोत्कृष्ट चित्रपट!

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात अभिनेता हृतिक रोशनला त्याच्या ‘सुपर 30’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी विकास बहल दिग्दर्शित ‘सुपर 30’ सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडला गेला. विशेष म्हणजे हा चित्रपट जुलै २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिकने बिहारचे गणितज्ञ आणि ‘सुपर 30’ चे संस्थापक आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बिहारमधील आनंद कुमार या शिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आली होती.

- Advertisement -

सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी

या सोहळ्यात, किचा सुदीपला मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टरचा खिताब देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेता धीरज धुपर यांची निवड झाली. या सोहळ्यात हृतिक रोशन, दिव्यांका त्रिपाठी, रश्मी देसाई, दिया मिर्झा आणि मलायका अरोरा यांच्यासह अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती.

२०२० दादासाहेब फाळके पुरस्करांची यादी

सुपर 30 सर्वोत्कृष्ट अभिनेता – हृतिक रोशन
मोस्ट प्रोमिसिंग अभिनेता – किच्चा सुदीप
बेस्ट अॅक्टर इन टेलीव्हिजन सिरीज – धीरज धुपर
बेस्ट अॅक्ट्रेस इन टेलीव्हिजन – दिव्यांका त्रिपाठी
मोस्ट फेव्हरेट टेलीव्हिजन अॅक्टर – हर्षद चोपडा
मोस्ट फेव्हरेट जोडी इन टेलीव्हिजन सीरीज – सृष्टी झा आणि शब्बीर अहलुवालिया
बेस्ट रियालिटी शो – बिग बॉस १३
बेस्ट टेलीव्हिजन सीरिज – दीया मिर्जा
बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल – अरमान मलिक
मोस्ट फॅशनेबल बिग बॉस १३ कंटेस्टंट – माहिरा शर्मा
बेस्ट अॅक्ट्रेस वेब सीरिज – दीया शर्मा
बेस्ट अँकर – मनिष पॉल
बेस्ट डिजिटल फिल्म – योर्स टूली
डेकेड स्टार २०२० – अनुपम खेर
बेस्ट पापराजी ऑफ द ईअर – मानव मांगलानी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -