घरमनोरंजनकरिनाची बॉलीवूडमध्ये १८ वर्षे, व्हिडिओद्वारे फॅनचे ट्रिब्यूट

करिनाची बॉलीवूडमध्ये १८ वर्षे, व्हिडिओद्वारे फॅनचे ट्रिब्यूट

Subscribe

करिना कपूर खाननं इंडस्ट्रीमध्ये १८ वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी एक खास व्हिडिओ तयार केला आहे.

अभिषेक बच्चनबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या करिना कपूर खाननं इंडस्ट्रीमध्ये १८ वर्ष पूर्ण केली आहेत. भारतीय चित्रपटात कपूर खानदानाचं एक वेगळंच महत्त्व आहे. कपूर खानदानातील असूनही करिनानं आपली अशी एक वेगळी ओळख चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण केली. अभिनयाच्या जोरावर तिनं या सृष्टीत १८ वर्ष पूर्ण केली आहेत. चित्रपटसृष्टी ही नेहमीच पुरुषप्रधान म्हणून ओळखली जाते. असे असतानाही करिष्मा आणि करिना या दोघींनीही नेहमीच आपल्या वेगळ्या भूमिकांनी छाप सोडली. त्यामुळं करिनाच्या चाहत्यांनी तिला ट्रिब्यूट म्हणून खास व्हिडिओ बनवला आहे.

काय आहे या व्हिडिओत?

करिनाच्या विविध भूमिकांच्या छटा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. करिनाने ‘कभी खुशी कभी गम’ मधील साकारलेली ‘पू’ असो वा ‘जब व्ही मेट’ मधील ‘गीत’ सगळ्याच व्यक्तिरेखेत तिनं एक आत्मा जागृत केला आहे. करिनाच्या रेफ्युजीपासून हिरॉईन अॅक्टपर्यंत सर्वच या व्हिडिओमध्ये फीचर करण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या याच व्यक्तिरेखा आणि काही प्रसिद्ध संवाद एटिड करून दाखवण्यात आले आहेत. शिवाय या व्हिडिओच्या बॅकराऊंडला बॉम्बे टॉकीजचं प्रसिद्ध गाणं ‘अक्कड बक्कड’ लावण्यात आलं आहे. करिनाच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच खास असेल. ट्विटरवरील तिच्या फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये करिनाचा गेल्या १८ वर्षांचा बॉलीवूडमधील प्रवास दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

करिना सोशल मीडियावर नाही

सध्या सोशल मीडियावर नसणं हेच चुकीचं मानलं जातं. पण इतकी प्रसिद्ध अभिनेत्री सोशल मीडियावर नाही. तरीही तिचं फॅन फॉलोईंग खूपच जास्त आहे. करिनाबद्दल सगळी माहिती तिच्या चाहत्यांना असते. एका मुलाखतीत ‘आपण सोशल मीडियावर नसलो तरीही आपल्याला सगळ्या जगाची माहिती असते’ असं करिनानं स्पष्ट केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -