घरमनोरंजन'कबीर सिंग'नंतर कियारा दिसणार 'या'अनोख्या भूमिकेत

‘कबीर सिंग’नंतर कियारा दिसणार ‘या’अनोख्या भूमिकेत

Subscribe

या चित्रपटाचे नाव 'गिल्टी' असून चित्रपटात ती रॉकस्टारच्या अंदाजात तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार

नुकताच प्रदर्शित झालेला कबीर सिंग या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी प्रेक्षकांना एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले. या जोडीसह चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर आता कियारा तिच्या आगामी चित्रपटात वेगळ्य़ाच लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक पाहून प्रेक्षकांना नक्की धक्का बसणार आहे. चित्रपट निर्माता करण जोहरने ट्विट करून कियाराचा हा नवा अंदाज शेअर केला आहे. या लूकमध्ये कियारा बिनधास्त मुलीच्या रूपात दिसत आहे.

- Advertisement -

लवकरच कियारा नेटफ्लिक्सच्या नव्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘गिल्टी’ असून चित्रपटात ती रॉकस्टारच्या अंदाजात तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. कियाराने कबीर सिंगमध्ये साकारलेल्या भूमिकेपेक्षा तिची व्यक्तिरेखा एकदम वेगळी असणार आहे. करण जोहरने हा फोटो शेअर करताना ‘कियारा आडवाणीचा गिल्टी चित्रपटातील नवा लूक. या चित्रपटाचे दिग्दर्शन रुची नरेन करत असून त्याची निर्मिती अपुर्व मेहता यांनी केली आहे.’

- Advertisement -

फक्त निर्माता करण जोहरच नाही तर खुद्द कियाराने देखील हा लूक शेअर केला आहे. हा लूक शेअर करताना तिने असे म्हटले की, ‘एक कलाकार म्हणून आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर येऊन वेगळ्या प्रकारची भूमिका साकारणे अधिक रंजक असते.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -