कॉफी विथ करण हा टॉक शो खूपच प्रसिध्द आहे. करण जोहर हा शो होस्ट करतो आणि बॉलीवूडच्या बऱ्याच सेलिब्रेटींना या शोमधून बोलतं करण्यात तो यशस्वी झाला आहे. या शोचा फॉरमॅट एकदम मजेशीर आहे आणि यामध्ये सेलिब्रेटीजची मस्ती आणि त्यांची गपशप ऐकायला मिळते. या सर्व गोष्टींमुळे हा शो खूप प्रसिध्द आहे. स्टार वर्ल्ड आणि हॉटस्टारवर हा शो प्रसारित होतो. कॉफी विथ करणचे हे ६वे पर्व आहे. यामध्ये करणने आधी दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, रणवीर सिंग, जान्हवी कपूर, सारा अली खान, अर्जून कपूर यांना शोमध्ये आमंत्रित केले होते. मुलगी आणि बाप, भाऊ-बहीण, नवरा-बायको, खास मित्र, एकत्र काम करणारे सहकारीही एकत्र आले होते. पण आता पहिल्यांदाच दोन भाऊ या शो वर एकत्र येणार आहेत.
शाहीद कपूर आणि इशान खट्टर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. करणने इन्स्टाग्रामद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली. या फोटोमध्ये करण जोहर सोबत शाहीद आणि इशान एकदम क्लासी दिसत आहेत. या दोन्ही भावांचा डॅपर लूक होता. शाहीदने पांढरे टी-शर्ट, मोनोक्रोम चेक पॅन्ट्स आणि त्यावर काळे ब्लेझर घातलेले. इशानने पांढरे टर्टलनेक टी-शर्ट, स्ट्रीप्ड ट्राउझर आणि ब्लेझर घालून लुक पूर्ण केला. तर करण जोहर काळा टी-शर्ट आणि पिवळे हेमलाइन असलेला काळा ब्लेझरमध्ये हॅन्डसम दिसत होता. तीघेही काळ्या सुट-बूट मध्ये स्टाइलिश दिसत होते.
View this post on Instagram
Brothers in arms! #koffeewithkaran @shahidkapoor @ishaan95 ? @houseofpixels @starworldindia @hotstar
करणने या फोटोला कॅप्शनदिले “Brothers in arms! #koffeewithkaran”. त्यामुळे आता फॅन्सला या एपिसोडची उत्सुकता लागून राहिली आहे. बडे मियाँ आणि छोटे मियाँला एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी आणि त्यांच्या लहान पणीच्या (एकत्र) आठवणी, गमती-जमती ऐकण्यासाठी सर्वजण खूपच आतूर आहेत.
शाहीदने यावर्षी ‘पद्मावत’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ हे दोन चित्रपट केले. तो आता अर्जून रेड्डीच्या ‘कबीर सिंग’ मध्ये अभिनेत्री कियारा अडवानी सोबत दिसणार आहे. हा सिनेमा २१ जून २०१९ ला रिलीज होणार आहे.
इशानने यावर्षी माजिद मजिदीच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तसेच सैराटचा हिंदी रिमेक ‘धडक’ या सिनेमामध्येही तो जान्हवी कपूर सोबत होता.