मलायका – अर्जुनची डिनर डेट

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे ती मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची. आजकाल ते दोघेही उघडपणे एकत्र फिरताना दिसत आहेत. नुकतेच त्या दोघांचे डिनर डेटचे फोटो समोर आले आहेत.

Mumbai
Malaika Arora and Arjun Kapoor
मलाइका आणि अर्जुन कपूर एकत्र

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे ती मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची. आजकाल ते दोघेही उघडपणे एकत्र फिरताना दिसत आहेत. नुकतेच अर्जुन आणि मलायकाचे डिनर डेटचे काही फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. त्यामुळं त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे. येत्या एप्रिलमध्ये ते विवाहबद्ध होणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. मलायका आणि अर्जुन टीव्हीवरील रिअॅलिटी शोमध्ये एकमेकांचा हात पकडून बसल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाले होते. मात्र आता त्या दोघांचे डिनर डेटचे फोटो समोर आले आहेत. त्यात अर्जुन हा मलायकाची विशेष काळजी घेताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#mallaikaarorakhan #arjunkapoor for their dinner date [email protected]

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या पूर्वी दिसले आहेत एकत्र

सध्या मलायका अरोरा छोट्या पडद्यावरील इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये परिक्षकेच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच या शोमध्ये अर्जुन कपूरने पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी मलायकाने तिचा ४५ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अर्जुनही उपस्थित होता. दोघेही मिलानवरून एकत्र मुंबईला परतले. मलायका आणि अर्जुनला मिलान विमानतळावर हातात हात घेतलेले पाहण्यात आले होते.

वाचा : मलायका-अर्जुनचे एप्रिल २०१९ मध्ये लग्न ?

वाचा : मलायका – अर्जुन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार

वाचा : ‘मलायका अरोरा’चा जलवा ४५ व्या वर्षीही कायम

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here