घरताज्या घडामोडीदिग्गज अभिनेते अविनाथ खर्शीकर यांचं निधन

दिग्गज अभिनेते अविनाथ खर्शीकर यांचं निधन

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाथ खर्शीकर यांचं दुःखद निधन झाल्याचे समोर येत आहे. आज सकाळी दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. तसेच जानेवारीमध्ये देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले होते.

अविनाश खर्शीकर यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट, मालिका, नाटकातून रंगभूमी गाजविली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. अविनाश खर्शीकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले यांच्यासह अनेक चित्रपटात काम केले आहे.

- Advertisement -

‘बंदिवान मी या संसारी’ हा अविनाश खर्शीकर यांचा १९७८ साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट, तसेच ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपली अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. ‘लफडा सदन’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘दिवा जळू दे सारी रात’ यांसारखी नाटके देखील त्यांनी गाजवली आहेत. अविनाश खर्शीकर यांच्या लूकची देखील तितकीच चर्चा ९०च्या दशकात चित्रपटसृष्टीत होती. ‘दामिनीत’ ही त्यांची पहिली दैनंदिन मालिका. ज्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. दरम्यान त्यांच्या निधनावर चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -