घरमनोरंजन‘झांगडगुत्ता’चा जगावेगळा रक्षाबंधन!

‘झांगडगुत्ता’चा जगावेगळा रक्षाबंधन!

Subscribe

वाचा मनोरंजनाच्या बातम्या थोडक्यात...

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्यांचा प्रेमाचा उत्सव. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे. या दिवसाची बहीण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते. आपली बहीण सुखात राहावी अशी प्रत्येक भावाची मनोकामना असते. पण याच दिवशी घरापासून, भावापासून आणि कुटुंबापासून वंचित असणार्‍या मुंबईतील कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणार्‍या भगिणींच्या डोळ्यांत अश्रू नव्हे तर चेहर्‍यावर आनंदाचे भाव होते. याचे कारण म्हणजे व्हिजन कॉर्पोरेशन लि. प्रस्तुत, फुटप्रिंट मीडिया एंटरटेनमेंट, पवन शेठ, मोरेश्वर संखे निर्मित आणि संदीप मनोहर नवरे लिखित दिग्दर्शित ‘झांगडगुत्ता’ सिनेमातील कलाकार भारत गणेशपुरे, संजय खापरे आणि विजय कदम यांनी या भागात येऊन या महिलांकडून राखी बांधून घेऊन, रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा साजरा केला. यावेळी त्या शेकडो महिलांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू होते. यावेळी अभिनेत्री अंशुमाला पाटील आणि सह-निर्माते विकी हाडा देखील उपस्थित होते.

दिग्दर्शक संदीप नवरे सांगतात की, सोशल अ‍ॅक्टिव्हीटिज इंटिग्रेशन (साई) या मुंबईतील संस्थेसोबत आमच्या ‘झांगडगुत्ता’ टिमला हा सामाजिक बांधिलकी जपणारा क्षण साकार करता आला. ‘झांगडगुत्ता’ या सिनेमातून आम्ही ज्याप्रकारे सामाजिक विषय हाताळतो आहोत तसाच पुढाकार ही संस्था घेत आहे. दोघांचे विषय आणि मार्ग जरी वेगळे असले तरी, समाजातील या उपेक्षित घटकाला एक कलाकार म्हणून आम्ही देणं लागतो आणि त्यामुळेच आम्ही याठिकाणी रक्षाबंधन साजरा केला.

- Advertisement -

भारत गणेशपुरे सांगतो की, एकतर मला खूप आनंद होतो आहे की एक कलाकार म्हणून इथे येऊन मला अशा महिलांकडून राखी बांधून घेण्याचे भाग्य मिळाले. यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून माझे डोळे पाणावले होते. माझ्या अशा उपेक्षित महिलांकरीता रक्षाबंधन साजरा करता आला यातच माझं जीवन सार्थकी लागलं. ‘झांगडगुत्ता’ सिनेमात आम्ही ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून समाजात घडणार्‍या गोष्टींकडे लक्ष वेधून घेत आहोत म्हणून लक्ष वेधून घेणार्‍या अशा क्षणातून आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. संजय खापरे सांगतात की, एरवी सिनेमाचे प्रमोशन हे पंचतारांकित हॉटेलात किंवा बड्या जागी केलं जातं. परंतु अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत सिनेमाचे प्रमोशन करण्याची ही ‘झांगडगुत्ता’ टिमची संकल्पना खूपच छान आहे. ‘झांगडगुत्ता’ हा सिनेमा देखील अशाच परंतु वेगळ्या सामाजिक विषयावर भाष्य करणारा आहे. लवकरच हा सिनेमा तुमच्या भेटीला येईल.विजय कदम सांगतात की, मी नेहमीच अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतो. कलाकार आणि सभ्य नागरिक म्हणून आपण सर्वांनी अशाप्रकारचा पुढाकार घेऊन इतरांना आनंद देण्याचे काम करावे. सिनेमातून आम्ही आनंद देतच असतो; पण अशा प्रकारच्या कामात आम्हाला आनंद मिळत असतो. लवकरच ‘झांगडगुत्ता’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


‘अगडबम’ची नाजुका परतली

मुंबई । गेल्या ८ वर्षांपूर्वी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘अगडबम’ सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सिनेमातील सर्वांची लाडकी ‘नाजुका’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, ‘माझा अगडबम’ या सिनेमाद्वारे झळकणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने गाजवलेल्या या पात्राचे आजही विशेष कौतुक केले जात असून, ‘माझा अगडबम’मध्ये ती यापेक्षाही आणखी वेगळ्या दमदार भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. कारण या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेबरोबरच लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती अशा त्रिसुत्री भूमिकेतही ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात, नाजुकाचा पती म्हणजेच रायबाच्या भूमिकेत, मराठीचा सुपरस्टार अभिनेता सुबोध भावे दिसणार आहे. त्यामुळे, अभिनयात वैविध्यपण जपणार्‍या सुबोधचा एक नवा अंदाज आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाची वजनदार मेजवानी देणार्‍या या सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझर पोस्टरवर पाठमोरी उभी असलेली एक लढवय्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजून येत नसल्यामुळे, हा टीझर पोस्टर प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.  सुपरहिट ‘अगडबम’च्या या दमदार सिक्वेलच्या सादरीकरणाची फळीदेखील तितकीच दमदार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चित्रपटनिर्माते आणि वितरक जयंतीलाल गडा यांची पेन इंडिया लिमिटेड कंपनी प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. शिवाय, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली असून, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत ‘बोगदा’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘टेक केअर गुडनाईट’

  मुंबई । मराठी चित्रपटांना सातासमुद्रापार नेऊ पाहणार्‍या ‘फिल्मीदेश’ या उपक्रमामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा डंका आता जगभर वाजणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ‘फिल्मीदेश’ उपक्रमाअंतर्गत भारताबाहेरील रसिकांपर्यंत बहुसंख्य प्रमाणात मराठी सिनेमे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती आहे. मात्र विदेशातील वितरण निर्बंधनामुळे हवे तितक्या प्रमाणात प्रादेशिक सिनेमे तिकडच्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, परदेशातील मराठी प्रेक्षकांसाठी त्यांच्या जवळच्या सिनेमागृहात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार आहे. याच उपक्रमांतर्गत, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेली ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बोगदा’ आणि ‘टेक केअर गुडनाईट’ हे तीन मराठी चित्रपट पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत उतरवली जात आहेत.उपक्रमाबद्दल बोलताना नितीन केणी म्हणाले, ‘१०-१५ वर्षांपूर्वी मराठी सिनेमे महाराष्ट्रातसुद्धा नीट जायचे नाही. ते जत्रेत आणि काही थिएटरमध्ये दाखवले जायचे. सरकारच्या मदतीने मग याला चालना मिळाली. आता महाराष्ट्रात मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. आज मराठी सिनेमांना चांगले थिएटर्स आणि शोज उपलब्ध होत आहेत. चार पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘काकस्पर्श’ नंतर मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आले असून, ‘नटसम्राट’, ‘सैराट’ आणि ‘दुनियादारी’ सारखे सिनेमे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे ते सुपरहिट झाले. इतकेच नव्हे तर, त्यामुळे मराठी चित्रपटाच्या आर्थिक सुबत्तेत वाढ झाली आहे. विदेशातदेखील अगदी हीच प्रक्रिया या उपक्रमाद्वारे राबवण्याचा आमचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले. ‘फिल्मीदेश’ द्वारे प्रदर्शित होणार्‍या सर्व चित्रपटांचे विदेशी प्रसारण ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’चा कार्यभाग सांभाळणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले पार पाडणार आहेत. ‘फिल्मीदेश’द्वारे मराठी चित्रपट जगभरात दाखवले जाणार असून या सिनेमांच्या वितरणाबरोबरच जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमाचे कार्यदेखील याअंतर्गत पार पाडले जाणार आहे.


`सूर्याची पिल्ले’ नाटकाला नवसंजीवन

मुंबई ।सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित “सूर्याची पिल्ले” हा नाट्यप्रयोग नव्याने सादर होत असून त्याचे सादरीकरण इंद्रवदन सहनिवासाच्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे होणार आहे. हे नाटक एका कर्तुत्ववान आणि सुप्रसिद्ध व्यक्तीच्या भरकटलेल्या सुपुत्रांना वास्तवाची जाणीव करून देणारी कथा आहे. सुनिल बर्वे, नंदू निमकर, सचिन साठे, मयुरेश आठवले, नीलिमा कान्हेरे, अश्विनी दामले, अर्चना जोशी आणि आशिष बापट हे कलाकार हा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. आताच्या रेट्रोफेमच्या जमान्यात जुन्या काळच्या पार्श्वभूमीवर असलेले हे नर्मविनोदी नाटक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी खात्री आहे, असा विश्वास इंद्रवदन सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रविंद्र आवटी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या काळात अन्य विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. “इंद्रांगण” हा एक नृत्य आणि गायन यावर आधारित मराठी वर्णातील सणांचा वैशिष्ट्यपूर्ण विवरण करणारा कार्यक्रम आहे. त्यात चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंतचे सर्व मराठी सण सामावले आहेत. काहीं सणांवर नृत्य तर काही सणांवर आधारित गाणी असा समतोल राखून एक बहारदार कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमाच्या नियोजन, मार्गदर्शन आणि दिग्दर्शन या तिनही बाबींची संपूर्ण जबाबदारी श्रीरंग आणि वेणू बडवे यांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे गायकांना सुरेल आणि परिपक्व बनविण्याची जबाबदारी माधुरीताई लोणकर आणि श्यामलताई घाटपांडे या दोघींनी उत्तम सांभाळली आहे. या कार्यक्रमात १७ नृत्ये आणि १४ गाणी सादर केली जाणार आहेत.


‘यू अँड मी’ व्हिडीओ अल्बमसाठी ईशा- शनाया एकत्र

मुंबई ।आपल्या हटके अंदाजात कटकारस्थानं करत धमाल उडवून देणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया आणि ईशा यांनी मैत्री सर्वांनाच माहिती आहे. हीच मैत्री कायम ठेवत पुन्हा एकदा मजा मस्ती करण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. या दोघीही एक नवीन अल्बम घेऊन आता प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. ‘यू अँड मी’ हा त्यांचा नवीन अल्बम असणार आहे. जरा सा कट्टा टाकू आता.. जरासी बाते तेढीमेढी..थोडासा किस्सा करू आता..थोडीशी यादे तेरी मेरी… करू आम्ही मनमानिया… ऐसी है अपनी यारीया… असे या गाण्याचे बोल आहेत. छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारी ही जोडी म्हणजे रसिका सुनील (शनाया) आणि आदिती द्रविड (ईशा) या माध्यमातून हा नवाकोरा अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे आदिती द्रविड हिने स्वतः हे गाणं लिहिलं असून आदिती आणि रसिकानेच हे गाणं गायलं आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाच्या गायकीची नवी ओळख प्रेक्षकांना होणार आहे. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. तर फुलवा खामकर हिने या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत.


‘इंटरनेटवाला लव्ह’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटील

 

मुंबई ।छोट्या पडद्यावर आणखी एक गोड लवस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही लवस्टोरी साधी नसून आजच्या आधुनिक युगाशी कनेक्ट करणारी आहे. कलर्स वाहिनीवर सोमवार, सायंकाळी ७ वाजता ‘इंटरनेटवाला लव्ह’ हा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने सोशल मीडियावरील तरुणांच वाढत प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख कलाकार जय (शिवीन नारंग आणि आद्या (तुनिशा शर्मा) यांची जुगलबंदी दाखवली जाणार आहे.
सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असणारा जय आणि याच माध्यमावर बंधनं घालणारी आद्या यांची नोकझोक पाहणे रंजक ठरणार आहे. त्याशिवाय कार्यक्रमात मिनिशा लांबा, वरूण बडोला, जयंती भाटिया सारखे नामवंत चेहरे प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. स्फिअर ओरिजिन द्वारा निर्मित इंटरनेट वाला लव्ह प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार की नाही हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.


 

आदिनाथ कोठारेची  पोलिसांकडे तक्रार

मुंबई । सायबर गुन्हेगारीची प्रकरणे ही जगभर घडत असतात आणि त्यांचे स्वरूप हे अत्यंत गंभीर असते. आपल्या देशातही या घटना अगदी सर्वसामान्य ते मान्यवरांच्या बाबतीत घडत असतात. आपले बॉलीवूड आणि त्यातील स्टारमंडळीही त्याला अपवाद नाहीत. सायबर घोटाळा असो, सायबर फसवणूक असो की एखाद्या व्यक्तीकडून दुसर्‍याची चुकीची ओळख दाखवून केलेली फसवणूक, या गोष्टी सतत घडत असतात.या सायबर गुन्हेगारीचे अलीकडचे प्रकरण घडले आहे ते प्रख्यात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेच्या बाबतीत. आघाडीचे अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांचा पुत्र असलेल्या आदिनाथ याने याबाबतीत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने एक बोगस फेसबुक खाते आदिनाथच्या नावाने उघडून त्याचा खोटा इमेल आयडीसुद्धा निर्माण केला होता. त्या माध्यमातून या गुन्हेगाराने त्याचे मित्र आणि परिचितांशी संपर्क प्रस्थापित केला आणि त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. त्याने आदिनाथ आणि त्याच्या कुटुंबाची छायाचित्रेही या खात्यावर टाकली आहेत, असेही या तक्रारीत म्हटले आहे. सायबर सेलच्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून आदिनाथच्या तक्रारीनंतर तपासही सुरु केला आहे. कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून तो भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ आणि ५०० अंतर्गत (फसवणूक आणि बदनामी) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६- सी व ६६-डी (खोटी ओळख दाखवून संगणकाच्या माध्यमातून फसवणूक) अंतर्गत नोंदविला गेला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -