घरमनोरंजनम्हणून तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या सेटवर झाली वैद्यकीय तपासणी!

म्हणून तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या सेटवर झाली वैद्यकीय तपासणी!

Subscribe

सध्या संपूर्ण जगासमोर कोरोना नावाचं संकट उभं राहिलं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांची काळजी घेत सरकारने काही ठोस निर्णय घेतले आहेत. मालिकांच्या सेटवर काम करणाऱ्या सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांची काळजी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी १९ ते ३१ मार्च पर्यंत सर्वप्रकारचे चित्रीकरण बंद राहिल असा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरमधील एका गावात होतं. चित्रीकरण बंद होण्याआधी या मालिकेच्या सेटवर सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी नुकतंच एक मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं.

त्याबद्दल बोलताना प्रेक्षकांची लाडकी अंजली बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर म्हणाली, “वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे कोणीही आजारी पडू नये म्हणून झी मराठी आणि सोबा फिल्म्स तर्फे नुकतीच तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अगदी स्पॉटबॉयज ते कलाकार या सगळ्यांची मोफत तपासणी केली गेली, तसंच आपण निरोगी कसं राहू शकतो, कोरोना व्हायरसचा सामना कसा करू शकतो, त्याला पसरण्यापासून किंवा त्याच्या पासून वाचण्यासाठी काय काय करू शकतो याची सगळी माहिती आम्हाला देण्यात आली. याबद्दल मी झी मराठी आणि सोबो फिल्म्सचे आभार मानते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -