घरमनोरंजनसंस्कृतीचे 'मोल' दर्शवणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

संस्कृतीचे ‘मोल’ दर्शवणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम आणि मिलिंद शिंदे यांची संवादफेक हे या चित्रपटाचे विशेष आकर्षण आहे. या चित्रपटात अस्सल खान्देशी संस्कृतीपासून समाजातील विविध महत्त्वाच्या घटकांवर भाष्य केले गेले आहे.

१९१३ साली ‘राजा हरिशचंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला. या घटनेला १०४ वर्षे पुर्ण झाली आहेत. परंतु, इतक्या वर्षात खान्देशी पार्श्वभूमी असलेला चित्रपट महाराष्ट्रात पहायला मिळाला नाही. व्हिडिओपट, अल्बम यांची उदंड निर्मिती खान्देशात झाली. पण सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट मात्र आला नाही. यासाठीच ‘मोल’ हा चित्रपट महत्वपूर्ण आहे. चित्रपटाची भाषा, गाणी, चित्रीकरणस्थळ, कलाकार, तंत्रज्ञ सगळं काही अस्सल खान्देशी आहे. मात्र यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे, अगदी आजच्या हिंदी , मराठी चित्रपटांच्या तोडीस तोड. हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबरला मराठी आणि अहिराणी अशा दोन्ही भाषांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माते योगेश कुलकर्णी आणि पारस बाविस्कर यांनी सर्व प्रेक्षकांना अस्सल खान्देशी मातीतल्या मराठमोळ्या चित्रपटाला पाहण्याचे आवाहान केले आहे.

हेही वाचा – पाण्याचं महत्त्व सांगणारा ‘एक होतं पाणी’

- Advertisement -

अशी आहे ‘मोल’ची कहानी

ही कहानी आहे महानगरातून आपल्या गावाकडे परतलेल्या ध्येयवादी कृषीशास्त्रज्ञाची. या कृषीशास्त्रज्ञाचे नाव किशोर असे आहे. किशोरची अत्यंत भावस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल. आपल्या शेतीतल्या प्रयोगांमुळे लोकप्रिय झालेल्या किशोरच्या आयुष्यात एक वादळ उभं राहतं. या वादळाला तो कसा सामोरे जातो आणि यात त्याच्या पत्नीची खंबीर साथ कशी मोलाची ठरते, हे पाहण्यासाठी मोल पहायलाच हवा.

‘या’ दिग्गजांनी केले आहे काम

‘नटरंग’, ‘फॅन्ड्री’, ‘बालक पालक’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारे किशोर कदम यांची अस्सल खान्देशी भाषेतली संवादफेक हे या चित्रपटाचे एक आकर्षण आहे. शिवाय मराठीतले लोकप्रिय कलाकार मिलिंद शिंदेही सोबतीला आहेत. या दिग्गजांबरोबर खान्देशतल्या पन्नासहून अधिक कलाकारांच्या यात भुमिका आहेत. चित्रपटाचे नायक योगेश कुलकर्णी आणि नायिका शीतल अहिरराव हे देखील खान्देशी आहेत. जळगावच्या रंगभूमीवर कार्यरत असलेला कलाकार अनिल मोरे खलनायकाच्या भूमिकेत आहे. तर जळगावचेच मनोज टाकणे, हितेंद्र उपासनी तसेच ‘आयतं पोयतं सख्यान’ हा धमाल अहिराणी एकपात्री प्रयोग गाजवणारा प्रवीण माळी, नीला पाटील-गोखले यांच्या देखील यात महत्वपूर्ण भुमिका आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – म्हणून करणवीरने मागितली सलमानची माफी

बहिणाबाई आणि विठ्ठल वाघ यांचे गीत

मोल संगीतमय चित्रपट आहे. खान्देशचे भूषण असलेल्या बहीणाबाई चौधरींच्या कवितांबरोबरच कविवर्य विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे यांची अर्थपूर्ण गीत या चित्रपटाचे विशेष आकर्षण आहेत. त्याचबरोबर ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ती सध्या काय करते?’ यांसारख्या हिट चित्रपटांमधून मेलडीप्रधान संगीत देणारे संगीतकार अविनाश विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांच्या संगीताचा सुंदर मिलाफ या चित्रपटाच्या गाण्यांमध्ये झालेला आहे .

योगेश कुलकर्णींनी केले आहे मनोज कुमारचे पर्दापण

चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी भोजपुरी चित्रपटही बनवले आहेत. भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी यांचे पदार्पण योगेश कुलकर्णी यांनी निर्मित केलेल्या ‘हमके माफी देई द’ या चित्रपटातून झाले. तसेच रविकिशन, मकरंद अनासपुरे, आशिष विद्यार्थी यांचा सुपरहिट भोजपुरी चित्रपट ‘पिंजरेवाली मुनिया’ देखील त्यांचीच निर्मिती होती. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातले कासारे हे त्यांचे गाव. आपल्या मायबोलीत चित्रपट निर्मिती करण्याचे त्यांचे स्वप्न ‘मोल’च्या रुपाने पूर्ण होत आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबरला मराठीतही संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

चित्रपटामुळे लोकांची झाली व्यसनमुक्ती

अमळनेर, चोपडा, पारोळा, साक्री, पिंपळनेर ,कासारे या गावांमध्ये हा चित्रपट प्रायोगिक तत्वावर प्रदर्शित करण्यात आला. या ठिकाणी चित्रपटाने रेकॉर्डब्रेक व्यवसाय केला. चित्रपटात व्यसनमुक्तीचा अतिशय मोलाचा संदेश देण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रेरणेने पिंपळनेर येथे ‘मुक्तांगण’ संस्था आणि डॉ. महेश जाधव यांच्या सहकार्याने बारा दिवसांचे निवासी व्यसनमुक्ती शिबीर घेण्यात आले. त्यातून अनेक लोक व्यसनमुक्त झाले, हे या चित्रपटाचे सगळ्यात मोठे यश असल्याचे योगेश कुलकर्णी यांनी सांगितले. चित्रपटाचे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातले योगदान लक्षात घेऊन जैन इरिगेशन उद्योग समूहातील हजारो सहकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय जैन उद्योगसमूहाने घेतला आहे .


हेही वाचा – पॉप सिंगर जस्टिन बिबरबद्दल लग्न बंधनात?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -