घरमनोरंजन'या' संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं पानिपतचं गाणं!

‘या’ संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं पानिपतचं गाणं!

Subscribe

पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारीत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत:द ग्रेच बेट्रेयल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या चित्रपटाच पहिलं गाणं आज प्रदर्शित झालं आहे. मर्द मराठा असं हे गाणं आहे. एकाचवेळी १३०० डान्सर या गाण्यात आहेत. गाण्यातून मराठमोळा साज अनुभवता येणार आहे. कारण या गाण्याला मराठमोळ्या संगीतकाराने संगीतबद्ध केले आहे.

पानिपतमधील हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मराठी आणि हिंदी भाषेचा वापर या गाण्यात करण्यात आला आहे. या गाण्यात अभिनेता अर्जुन कपूर, मोहनीश बहल, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, कृती सनॉन असे तब्बल १३०० कलाकार आहेत. हे गाणं चित्रीत करण्यासाठी १३ दिवस लागले आहेत. कर्जत येथे या गाण्याचे चित्रीकरण पार पडले. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी कर्जतला शनीवारवाड्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. हे गाणं अजय-अतुलसोबत कुणाल गांजावाला, सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर, पद्मनाभ गायकवाड आणि प्रियांका बर्वे यांनी गायलं आहे.

- Advertisement -

अटकेपार पोहोचलेल्या मराठय़ांनी लढलेल्या सर्वात मोठय़ा लढाईची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. यामध्ये अर्जुनसोबतच संजय दत्त व क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. संजय दत्त यात अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत तर क्रिती पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -