घरमहाराष्ट्र'राज्यात युतीचं सरकार यावं', यासाठी तरुणाचे टॉवरवर चढून आंदोलन

‘राज्यात युतीचं सरकार यावं’, यासाठी तरुणाचे टॉवरवर चढून आंदोलन

Subscribe

नंदुरबार तालुक्याच्या कारली गावातील एका शिवसैनिकाने मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन केले आहे. भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, या मागणीसाठी हे आंदोलन केले गेल्याचे बोललं जात आहे.

भाजपने सत्तास्थापनेला असमर्थता दर्शवल्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीलाही सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून आमंत्रित करण्यात आले. तरीही राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. आता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन मोठे पक्ष सत्तास्थापन करतील, अशा चर्चा समोर आल्या आहेत. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. तिन्ही पक्षांकडून सतत बैठका घेतल्या जात आहेत. असे सर्व चित्र जरी असले तरी अजूनही कार्यकर्त्यांना महायुतीचेच सरकार यावे असे वाटत आहे. त्यासाठी शिवसैनिकांकडून आंदोलनेदेखील केली जात आहेत.

काय आहे प्रकरण 

नंदुरबार तालुक्याच्या कारली गावातील एका शिवसैनिकाने मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन केले आहे. भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, या मागणीसाठी हे आंदोलन केले गेल्याचे बोललं जात आहे. तर, त्या शिवसैनिकाला टॉवरवरुन खाली उतरवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेने एकत्र येत महायुतीचेच सरकार स्थापन करावे अशी अपेक्षा या आंदोलक शिवसैनिक व्यक्त केली आहे.

- Advertisement -

तुकाराम भिका पाटील, असे या शेतकरी शिवसैनिकाचे नाव असून ते गेले अनेक वर्ष शिवसेनेचे शाखा प्रमुख राहिले असल्याचेही ते सांगतात. टॉवरवर चढण्यापूर्वी त्यांनी एक पत्र देखील लिहिले आहे. त्या पत्रात आम्हाला आघाडी सरकारचे घोटाळे नको, यापूर्वी खूप भोगलंय. महाराष्ट्राने युतील भरभरुन प्रेम दिल आहे. त्यास लाथाडू नका, हा जनादेशाचा अपमान आहे, असे लिहिण्यात आले आहे. दरम्यान, या आंदोलक शिवसैनिकाला खाली उतरवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -