घरमनोरंजनप्रियांकाच्या वेडिंग गाऊनवर, 'या' खास व्यक्तीचं नाव

प्रियांकाच्या वेडिंग गाऊनवर, ‘या’ खास व्यक्तीचं नाव

Subscribe

खास 'एम्ब्रॉयडरी'च्या साहाय्यने त्या खास व्यक्तीचं नाव प्रियांका चोप्राच्या वेडिंग गाऊनवर शिवण्यात आलं होतं.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांनी जोधपूरमध्ये भारतीय आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. या दोनही पद्धतीच्या विवाहीतल त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील प्रियांकाच्या ‘देसी‘ आणि ‘विदेशी‘अशा दोन्ही लूक्सना जगभरातून पसंती मिळते आहे. दोनही लूक्समधील प्रियांकाचा पेहराव आणि तिच्या अदा चाहत्यांना अक्षरश: घायाळ करत आहेत. दरम्यान, सर्वात जास्त चर्चा आहे ती प्रियांकाच्या ख्रिश्चन वेडिंग गाऊनची. पांढऱ्या रंगाचा आणि नेटवर्क असेलला असा प्रियांकाचा सुंदर वेडिंग गाऊन सर्वांनाच आकर्षित करणारा आहे. आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर ब्रँड राल्फ लॉरेन यांनी प्रियांकाचा हा वेडिंग गाऊन तयार केला आहे. दरम्यान, या वेडिंग गाऊनचं आणखी एक वैशिष्ट्य समोर आलं आहे. प्रियांकाने लग्नामध्ये परिधान केलेल्या या शानदार वेडिंग गाऊनवर एका स्पेशल व्यक्तीचं नाव कोरण्यात आलं होतं. हे नाव होतं प्रियांकाचा पती निक जोन्सचं. खास ‘एम्ब्रॉयडरी’च्या साहाय्यने निकचं नाव पीसीच्या वेडिंग गाऊनवर शिवण्यात आलं होतं. समोरुन पाहतेवेळी आपल्याला हे नाव सहज दिसत नाही पण गाऊनवर हे नाव कोरण्यात आलं असल्याची  माहिती खुद्द डिझाईनर ब्रँड राल्फ लॉरेन यांनी एका मुलाखतीतत सांगितलं आहे.

प्रियांका हा आलिशान आणि शानदार वेडिंग गाऊन परिधान करुन, लग्न मंडपाकडे जात असल्याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकाची आई मधू चोप्रा यादेखील खास ख्रिश्चन लूकमध्ये दिसत आहेत. प्रियांकाच्या वेडिंग गाऊनचा भलामोठा घेर या व्हिडिओमध्ये सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

Once upon a fairytale… @nickjonas Link in bio @people

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

- Advertisement -

 सौजन्य- प्रियांका चोप्रा, इन्साटाग्राम


लेहंग्यावरही मातृभाषेतील नावं

प्रियांकाचा वेडिंग गाऊन आणि त्यावर शिवलेलं निक जोन्सचं नाव, हे जितकं चर्चेत आहे तितकाच चर्चेत आहे प्रियांकाचा देसी वेडिंह लेहंगा. उपलब्ध माहितीनुसार, प्रियांकाने भारतीय पद्धतीच्या लग्नामध्ये परिधान केलेल्या लाल रंगाच्या लेहंग्यावरही तिच्या मातृभाषेत ३ जणांची नावं शिवण्यात आली होती. यामध्ये प्रियांकाच्या आई-वडिलांच्या नावांचा आणि निक जोन्सच्या नावाचा समावेश होता. प्रियांकाच्या अत्यंत जवळच्या या ३ व्यक्तींची नावं ‘एम्ब्रॉयडरी’च्या साहाय्यने लेहंग्यावर शिवण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

And forever starts now… ❤️ @nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

- Advertisement -


पाहा:  प्रियांका – निकचा रिसेप्शन सोहळा!
Video : विकीच्या URI चित्रपटाचं धमाल डबिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -