घरमनोरंजनकर्नाडांच्या कथेवर आधारित रक्त कल्याण

कर्नाडांच्या कथेवर आधारित रक्त कल्याण

Subscribe

अभिनेत्याबरोबर रंगकर्मी म्हणून गिरिश कर्नाड यों नाव घेतले जाते. दक्षिणेकडच्या चित्रपटांबरोबर मराठीतही त्यांनी चित्रपतात काम केलेले आहे. लेखक म्हणूनही त्यांच्या नावाला वलय आहे. तांळेदंड ही त्यांची कथा अतिशय गाजलेली आहे. राम गोपाल बजाज याने त्याचा हिंदी अनुवाद केलेला आहे. दिग्दर्शक सुनिल शानभाग याला ही कथा अधिक भावली आणि यातून रक्त कल्याण हे हिंदी नाटक लिहिले गेले. 9 मार्चला या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग साहित्य संघातल्या प्रायोगिक रंगभूमीवर होणार आहे.

साहित्य संघात ड्रामा स्कूल मुंबईच्यावतीने नवकलाकारांसाठी नाट्य प्रशिक्षणाची कार्यशाळा चालवली जाते. त्यातले कलाकार एकत्र येऊन रक्त कल्याण हे नाटक सादर करणार आहेत. दक्षिण भारतातील बाराव्या शतकातील भक्ती चळवळीवर हे नाटक आधारलेले आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक अशी पार्श्वभूमी या कथेला आहे. आर्यन टंडन, अभिजित सिंग, अनमोल ओबेरॉय, अपेक्षा होरा, दुशा नंदू यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. सायंकाळी 7 वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -