घरमनोरंजनVideo: रेखा यांचा रॅपर अंदाज

Video: रेखा यांचा रॅपर अंदाज

Subscribe

आयफा अवार्ड दरम्यानचा रेखा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री रेखा या अजूनही आपल्या वेगळ्या अंदाजामुळे आणि स्टाईलमुळे चाहत्यांचा मनं जिंकून घेत असतात. नुकताच रेखा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ आयफा अवार्डच्या दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये अलिया भट्ट रेखा यांना आपल्या ‘गल्ली बॉय’ या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग शिकवत आहे. हा डायलॉग रेखा यांनी हुबेहुबे आलियासारखा बोलून दाखवला आहे. हे ऐकून सगळे कलाकार थक्क झाले. तसंच उपस्थित असलेल्या सर्व कलाकरांनी मोठमोठ्याने टाळ्या वाजवून रेखा याचं कौतुक केलं.

- Advertisement -

हेही वाचाकरिनाला जावई पसंत आहे!

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे.

- Advertisement -

लवकरच महेश भट्ट दिग्दर्शित ‘सडक २’ चित्रपटात आलिया भट्ट दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच रणबीर कपूर सोबत आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट देखील पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. करण जौहर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

हेही वाचा ‘महालक्ष्मी’च्या रूपात प्रकटली तेजस्विनी पंडित!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -