रिया चक्रवर्तीने २०१२ मध्ये केलेले ‘हे’ tweet पुन्हा होतंय व्हायरल

पुन्हा एकदा जुने ट्विट पाहून नेटीझन्सच्या चर्चांनाही उधाण

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात अटकेत असून तिला बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीतून रियाची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूड विश्वासह सुशांतच्या चाहत्यांचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून सुशांतला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर व्यक्त होत होते.

दरम्यान सोशल मीडियावर आता रियाचे ८ वर्षापूर्वीच ट्विट व्हायरल झाले आहे. हे व्हायरल झालेले ट्विट नेटीझन्स रिट्विटही करत आहेत. एकीकडे ‘जस्टीस फॉर सुशांत’ टॅग व्हायरल होत असताना दुसरीकडे ‘जस्टिस फॉर रिया’ असाही टॅग व्हायरल होत आहे. रिया चक्रवर्तीचे वडील सैन्यात होते म्हणूनच रियाचं शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल अंबाला कँटमध्ये झालंय. त्यांची पोस्टिंग होती नागालँडमध्ये झाली होती. त्याच संदर्भात रियाने १५ जानेवारी २०१२ मध्ये हे ट्विट केलं होतं.

असं केलं आठ वर्षापूर्वी रियाने ट्विट

माझे वडील नागालँडमध्ये असून आपल्यासाठी ते आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करत असल्याचं रियाने म्हटले आहे. त्याचेवळी तिने भारतीय सैन्याला सलामही या ट्विटमधून केला होता. तर रियाचे देशप्रेम या ट्विटमध्ये दिसत असले तरी पुन्हा एकदा जुने ट्विट पाहून नेटीझन्सच्या चर्चांनाही उधाण आल्याचे दिसत आहे.


ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रिया चक्रवर्तीला अखेर NCB कडून अटक