पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करणाऱ्या आजीला रितेशची मदत!

लॉकडाऊमध्ये आता अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कुणाचे व्यवसाय बंद आहेत, तर कुणाचे पगार कापले आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. हातावर पोट असलेल्यांचे तर हालच झाले आहेत. पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या अशाच एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अभिनेता रितेश देशमुखने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रितेशने हा व्हिडिओ केवळ शेअरच केला नाही तर त्या आजीला मदत देखील केली.

काय आहे व्हिडिओत

रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वृध्द महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ही महिला लाठीकाठी खेळताना दिसते आहे. आपलं कौशल्य सादर करत ती पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे. रितेश देशमुखनं या वृद्ध महिलेला वॉरिअर आजी असं म्हटलं आहे.

 

रितेशने आपल्या अकाऊंटवर हा व्हिडिओ केवळ शेअर केला नाही. तर या आजीचा पत्ताही शोधून काढला आणि आजीला मदतही केली. त्याचबरोबर रितेशने इतरानांही या आजीला मदत करण्याचे आवाहन केलं आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील अशा अनेक परप्रांतीय मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या गावाची वाट धरली. यावेळी अभिनेता सोनू सूद त्यांच्या मदतीला आहे. मात्र जसाजसा लॉकडाऊन वाढत आहे तसतशी आर्थिक समस्या अधिक वाढत आहे.


हे ही वाचा – आयसोलेशनमध्ये केस कापणं पडलं महागात, भरावा लागला लाखोंचा दंड!