‘साहो’च्या अभिनेत्रीने एअरपोर्टवर केलेला स्टंट होतोय व्हायरल

सध्या एवलिन आगामी साहो चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.

Mumbai

प्रभासच्या अॅक्शन चित्रपट साहोचा टिझर प्रदर्शित झाला आहे. बाहुबली नंतर प्रभासचा पहिला चित्रपट साहो १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल एवलिन शर्मा देखील दिसणार आहे. सध्या एवलिन आगामी साहो चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.

एवलिन शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री एवलिन एअरपोर्टवर स्टंट करताना दिसतेय.

एवलिन शर्माचा साहो या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहे, याचा खुलासा आता पर्यंत करण्यात आलेला नाही. एवलिनने शेअर केलेल्य़ा या व्हिडिओमध्ये तिला आपल्या चाहत्यांना असे सांगायचे आहे की, साहो चित्रपटाची शेवटच्या टप्प्यातील शुटिंग सुरू असून हैद्राबादमध्ये सुरू असणारी शुटिंग लवकरच संपणार आहे. दरम्यान प्रभासच्या साहोचा टिझर प्रदर्शित झाला असून हा टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here