घरमनोरंजन‘कसाब साध्वी प्रज्ञा यांचा साथीदारच’- वरूण ग्रोवर

‘कसाब साध्वी प्रज्ञा यांचा साथीदारच’- वरूण ग्रोवर

Subscribe

हेमंत करकरे यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवले. त्यांना याची शिक्षा मिळाली असल्याचे धक्कादायक वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य संशयित आणि भाजपच्या उमेदवारी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले असल्याचे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सेक्रेड गेम्सचा लेखक वरुण ग्रोवरनेही याबाबत ट्विट केलं आहे.

‘मी नि:शब्द झालोय. भाजपाच्या भोपाळच्या उमेदवार आणि दहशवादच्या आरोपी उघडपणे २६/११ चे हिरो हेमंत करकरे यांच्या मृत्यूची कामना करतात. मग तर, कसाब साध्वी प्रज्ञा यांचा साथीदारच,’ असं ट्विट वरुणनं केलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले साध्वी

प्रज्ञा सिहं ठाकूर यांनी असे म्हटले आहे की, हेमंत करकरे यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवले. त्यांना याची शिक्षा मिळाली असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान, मी हेमंत करकरे यांना बोलली होती की, बोलले की तुमचा सर्वनाश होईल, त्यानंतर सव्वा महिन्यातच त्यांना दहशतवाद्यांनी मारले. दहशतवाद्यांनी करकरे यांना मारुन माझे सुतक संपवले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.

बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या साध्वींना उमेदवारी दिल्यामुळे विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. त्यांच्या उमेदवारीला आव्हानही देण्यात आलं आहे. हे करत असतानाच साध्वी यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘हेमंत करकरे हे देशद्रोही, कुटिल आणि धर्मविरोधी होते. ते मला म्हणायचे की, सत्यासाठी मला देवाकडे जावे लागेल का? तर मी त्यांना बोलले होती की, तुम्हीला गरज वाटत असेल तर तुम्ही जावा’ तसंच मी त्याला म्हणाले होते की तुझा सर्वनाश होईल. त्यांनी मला शिव्या दिल्या होत्या. त्यांना दहशतवाद्यांनी मारल्यानंतर माझे सुतक संपले’, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -