‘सेक्रेड गेम्स २’चं चित्रीकरण सुरु, सैफचा फोटो व्हायरल!

'सेक्रेड गेम्स २' च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्यातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानचे चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mumbai
saif ali khan
सैफ अली खान (सेक्रेड गेम्समधील दृष्य)

वेबसीरिजमधील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असताना त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ‘सेक्रेड गेम्स २’ च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्यातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानचे चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटफ्लिक्सवरील तुफान गाजलेल्या या वेबसीरिजला प्रेक्षकांनी खुपच पंसत केले होते. यामधील कलाकार नवाजुद्दीन सिद्धीकी, राधिका आपटे, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि इतर यांच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.

वाचा : #MeToo मुळे सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लटकला

चित्रीकरण लांबण्याची शक्यता होती

देशभरात सुरु असलेल्या मीटू मोहिमेनंतर या वेबसीरिजचे सहलेखक वरुण ग्रोव्हर यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यानंतर सेक्रेड गेम्स २ चे चित्रीकरण लांबणीवर जाण्याची शक्यता होती. पंरतू काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने चित्रीकरणाचे काम सुरळीत सुरु असल्याचे सांगितले. तसेच सहलेखक वरुण ग्रोव्हरच याचे लेखक असल्याचेही त्यांनी निश्चित केले.

वाचा : सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांनी सीजन २ साठी सुरू केली मोहीम

सैफचा फोटो व्हायरल 

सैफ अली खान त्याच्या भूमिकेत म्हणजेच सरताज सिंग या व्यक्तीरेखेत असतानाचे चित्रीकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा सीन मुंबईतील झेव्हियस कॉलेजमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. यामध्ये त्याचे सहकलाकार नीरज काबीदेखील सहभागी होते. या वेबसीरिजचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले असून सहदिग्दर्शक म्हणून नीरज घयवान काम पाहत आहेत.

वाचा : ‘सेक्रेड गेम्स २’ साठी नवाजुद्दीने घेतले ‘एवढे’ मानधन!

सेक्रड गेम्स-२ मध्ये हे विशेष

या सीजनमध्ये नवाजुद्दीन हा गणेश गायतोंडेच्या भूमिकेत दिसणार आहे. जतिन सराना हा बंटीच्या भूमिकेत दिसेल. सीरिज-२ मध्ये गणेश गायतोंडे तुरुंगातून सुटतो या पासून सीरिज सुरु होईल. गणेश गायतोंडे परदेशात जातो तर बंटी भारतात थांबतो. सेक्रेडच्या कथेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही नवीन कॅरेक्टरही प्रेक्षकांना दिसणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here