घरमनोरंजननागराज मंजुळेंचा छत्रपतींना अमेरीकेतून मानाचा मुजरा

नागराज मंजुळेंचा छत्रपतींना अमेरीकेतून मानाचा मुजरा

Subscribe

सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळें यांनी छत्रपती शिवाजी महराजांचा वेशपरिधान कलेल्या एका तरूणा सोबतचा फोटो फेसबुकवरून अपलोडकेला आहे.

आज ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत’ ‘छत्रपती शिवाजी महराजांची जयंती. याचेच औचित्य साधत सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेशपरिधान कलेल्या एका तरूणा सोबतचा फोटो अपलोड केला आहे. अमेरीकेच्या न्युयॉर्कमध्ये काढलेला हा फोटोफेसबुक आणि ट्विटर वरून त्यांनी अपलोड केला आहे. संपूर्ण देशभरात छत्रपती शिवरायांची जयंती अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येते. महाराष्ट्रतील गड-किल्लयांवर यादिवशी अनेक कार्यक्रम राबवले जातात. नुसत्या नावानेच मोगल साम्राज्याला काप्रभरायला लावणऱ्या छत्रपतींच्या गौरवगाथा वाचल्यावर अभिमानाने उर भरून येतो. त्यांची विलक्षण राजनीति, महिलां प्रतीचा आदर, उत्तम प्रशासक म्हणून किर्ती असलेल्या महाराजांची १९ फेब्रुवारी तारखेप्रमाणे असलेली शिवजयंती जगभरातील शिवप्रेमींना एकत्रितरित्या साजरी करण्याची संधी मिळते.

न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती 

कन्सॉलेट जनरल ऑफ इंडिया, छत्रपती फाऊंडेशन आणि अल्बनी ढोल पथक यांच्यावतीने अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये छत्रपतींचा जन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला नागराज मंजुळे यांना प्रमुख अतिथी म्हणून  आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान हा फोटो कार्यक्रमा नंतर काढण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

सेल्फीचा मोह आवरला नाही

या फोटोखाली नागराज यांनी असा सेल्फी काढण्याचा मोह कधीतरीच होतो, असे कॅप्शनही दिले आहे. या कार्यक्रमा दरम्यान नागराज मंजुळे यांनी भाषण करत महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. अमेरीकेतील अनेक मराठी मंडळी  यावेळी सभागृहात उपस्थित होती. कन्सॉलेट जनरल ऑफ इंडिया, छत्रपती फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत अनेक मराठी भाषिक या कार्यक्रमात उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -