घरमनोरंजन#पुन्हानिवडणूक? वादावर सिद्धार्थ जाधवने दिलं स्पष्टीकरण; म्हणाला...

#पुन्हानिवडणूक? वादावर सिद्धार्थ जाधवने दिलं स्पष्टीकरण; म्हणाला…

Subscribe

राज्यात सत्तेचा तीढा सुटता सुटत नाहीये. अशातच मराठी कलाकरांनी सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक? या ट्वीटर हॅशटॅगने एकच गोंधळ घातला. कलाकारांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले. आणि प्रत्येकजण त्या ट्वीटचा आपल्यापरिने अंदाज बांधू लागला. या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी कलाकारांना फैलावर घेतलं. राजकारणात पडू नका असे सल्लेही दिले. नेटकऱ्यांच्या या सल्ल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधवने यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

सिध्दार्थ म्हणतो,’आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुरळा’ आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्यामागची आमची ‘भूमिका’ लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेलसुद्धा. सर्वांच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही.’

काल सोनाली कुलकर्णी,अंकुश चौधरी,सोनाली कुलकर्णीया कलाकारांनी सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग पोस्ट केला होता. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला असून भाजपच्या समर्थनार्थ हे ट्विट होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या संबंधी कलाकारांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले सचिन सावंत

कोब्रो पोस्टच्या व्हिडिओमध्ये दिसले होते की भाजप पैसे देऊन हिंदी कलाकारांना ट्विट करायला सांगितले. मराठी कलाकारांचा असा वापर होऊ नये. भाजप असं करु शकते. भाजप सूडाचं राजकारण करुन इथे अनैतिकता पसरवत आहे. मराठी कलाकारांचा वापर ते करु शकतात यात नवीन काही नाही. असे होऊ नये, महाराष्ट्रात अशी प्रथा पडू नये, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सगळ्या कलाकारांनी एकाच वेळी एकच ट्विट केल्याने काँग्रेस आक्षेप घेतला आहे. ज्या पद्धतीने एकचा वेळी कलाकार #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत आहेत. त्यातच भाजप आयटी सेलही सक्रिय झाली आहे. भाजप असं करु शकते. भाजप सूडाचे राजकारण करून इथे अनैतिकता पसरवत आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -