‘या’ मालिकेमध्ये शिजणार विष्णू मनोहर यांच्या खास रेसिपी!

सोनी मराठी वाहिनीवर व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर 'जुळता जुळता जुळतंय की' या मालिकेत नामांकित शेफ विष्णू मनोहर यांची खास रेसिपी मालिकेमधून प्रेक्षकांना १८ फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता अनुभवायला मिळणार आहे.

Mumbai
julta julta jultay ki serial
जुळता जुळता जुळतंय की मालिकेमध्ये शेफ विष्णु मनोहर

सोनी मराठी वाहिनीवर व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर नात्यांची लव्ह स्टोरी सेलिब्रेट करणार आहे. ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेतही अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. आपल्याला माहितीच आहे की, अपूर्वाचे स्वप्न आहे की तिचे स्वत:चे हॉटेल असावे आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजयने सावकाराकडून कर्ज घेतले होते आणि त्यानंतर झालेला गोंधळ हे सर्वांना माहितच आहे. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अपूर्वाकडे हॉटेल विकणे हा एकमेव मार्ग होता. पण विजय तिला असे करण्यापासून थांबवतो. त्यानंतर विजयचे लक्ष एका जाहिरातीकडे जाते. ती जाहिरात महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर कोल्हापुरात येऊन बेस्ट शेफची निवड करणार असल्याबद्दल असते. अपूर्वाच्या हॉटेलमध्ये विष्णू मनोहर येऊन तिला कोणता पदार्थ शिकवणार आहे? आणि त्यासोबत कोणत्या टिप्स देणार? हे आपल्याला ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेच्या सोमवारच्या विशेष भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

नामांकित शेफ विष्णू मनोहर यांच्या रेसिपी जाणून घेण्यासाठी स्त्रिया उत्सुक असतात. स्त्रियांची ही आतुरता आता ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेमधून पूर्ण होणार आहे. अपूर्वाला शिकवता शिकवता प्रेक्षकानांही ते अनुभवायला मिळणार आहे. यासंबंधीत विष्णू मनोहर म्हणाले की, ‘अपूर्वाला रेसिपी शिकवता शिकवता प्रेक्षकांनाही छान पदार्थ शिकवायचे आहेत आणि ते पदार्थ फिल्मी स्टाईल शिकवायचे नसून पूर्णपणे ते पदार्थ शिकता येतील आणि घरी करता येतील. माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल,’ असे त्यांनी सांगितले. ‘जुळता जुळता जुळतंय की’चा एक तासाचा विशेष भाग १८ फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता सोनी मराठीवर आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here