सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!

सुशांतचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स आता त्याचं कटुंब हाताळेल. या माध्यमातून सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला जाईल.

Mumbai
सुशांतसिंग राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत या निर्णयाची घोषणा केली आहे. गुलशनच्या आठवणी आणि सन्मानासाठी आम्ही सुशांतसिंह राजपूत फाउंडेशनची निर्मिती करत आहोत. या फाउंडेशनद्वारे सुशांतच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच विज्ञान, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना पाठबळ दिलं जाईल.

“सुशांतच्या आठवणी आणि सन्मानासाठी आम्ही ‘सुशांतसिंह राजपूत फाउंडेशन’ची निर्मिती करत आहोत. या फाउंडेशनद्वारे सुशांतच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच विज्ञान, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना पाठबळ दिलं जाईल. तसेच पाटण्यातील राजीव नगर येथील त्याच्या घराचं रुपांतर स्मारकात करत आहोत. तिथे आम्ही त्याच्या वैयक्तिक वस्तू ठेवू. यामध्ये त्याचे पुस्तकं, टेलिस्कोप, फ्लाईट सिम्युलेटरसह अनेक गोष्टी ठेवू, जेणेकरुन त्याचे चाहते त्याच्यासोबत सदैव जोडले राहतील”, अशी घोषणा कुटुंबियांनी केली आहे.

“त्याच चाहत्यांवर प्रचंड प्रेम होतं. तुम्ही सुद्धा आमच्या मुलांवर जे प्रेम केलं, त्यासाठी मनापासून तुमचे आभार. आता तो आपल्यासोबत नाहीये म्हणूनच त्याच्या आठवणी जतन करण्यासाठी आम्ही सुशांत सिंह राजपूत फाऊंडेशनची स्थापना करणार आहोत. या फाऊंडेशनच्या अंतर्गत आम्ही त्याला आवडत असलेल्या कलाविश्व, तंत्रज्ञान, आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत. तसंच पाटणामधील त्याच्या घरात सुशांतचं स्मारक उभारण्यात येणार असून येथे त्याच्या काही आवडत्या वस्तूंचा संग्रहदेखील करण्यात येणार आहे. यात त्याची पुस्तके, दुर्बिणी, फ्लाइट सिम्युलेटर, गिटार, फर्निचर यांसारख्या काही गोष्टींचा समावेश असेल.

सुशांतचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स आता त्याचं कटुंब हाताळेल. या माध्यमातून सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला जाईल.


हे ही वाचा – कोरोनाबाबत WHO ने जगाला दिली गुड न्यूज, लसीबाबत केली मोठी घोषणा!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here