घरमनोरंजनम्हणून तनुश्री दत्ता भडकली नेहा कक्करवर!

म्हणून तनुश्री दत्ता भडकली नेहा कक्करवर!

Subscribe

#MeToo मोहिमेच्या माध्यमातून अन्यायाविरोधात आवाज उठविणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता गायिका नेहा कक्करवर चांगलीच भडकली आहे. इंडियन आयडॉलच्या सेटवर नेहासोबत एका स्पर्धकाने गैरवर्तन केल्यानंतरही ती शांत कशी काय बसली? तसंच MeToo मोहिमेअंतर्गत अनु मलिक यांच्यावर महिलांनी आरोप केलेले असतानाही नेहा त्यांच्यासोबत काम कशी काय करु शकते? असं तुनश्रीने एका मुलाखतीत विचारलं आहे.

तनुश्री दत्ता म्हणाली, सोना मोहोपात्रा आणि तिच्या सारख्याच निर्भीड आणि बेधडकपणे स्वत:च मत मांडणाऱ्या महिलांसाठी मला उभं राहून टाळ्या वाजवाव्याशा वाटतात कारण त्या अनु मलिक यांना न घाबरता या सगळ्याला सामोरं गेल्या. यावेळी तीने सोनी वाहिनीलाही अनेक प्रश्न विचारले,सोनी सारखी वाहिनी अनु मलिक यांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये परिक्षक म्हणून कसं काय निवडतात. या व्यक्तीविरोधात अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाची तक्रार केली आहे. नैतिकतेपेक्षा कार्यक्रमाचा टीआरपी इतका महत्त्वाचा आहे का?, असं तनुश्री म्हणाली.

- Advertisement -

त्यानंतर तनुश्रीने इंडियन आयडॉल च्या सेटवर नेहा कक्करसोबत जो प्रकार घडला त्यावरही तीचं मत मांडलं. इंडियन आयडॉलच्या सेटवर एका स्पर्धकाने चक्क नेहाला किस केलं. त्यावेळी तिला जाणवलं की अशा घटना घडल्यावर नेमकं काय होतं. मात्र ती तरीही शांत राहीली.नु मलिकसोबत काम करतानाही तिने मौन बाळगलं आणि आताही ती तेच करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -