घरमनोरंजनजज्बामध्ये दिव्यांगांचे साहस

जज्बामध्ये दिव्यांगांचे साहस

Subscribe

एकीकडे आय पी एल तर दुसरीकडे विश्वचषक क्रीडा स्पर्धेची घोषणा झालेली आहे. भारतीय नागरिकांमध्ये निवडणुकीविषयी जेवढे कुतूहल आहे तेवढीच क्रिकेटविषयी उत्कंठाही आहे. अशा पार्श्वभूमीवर सचिंद्र शर्मा दिग्दर्शित बाळा हा मराठी चित्रपट शिवाय हिंदीत एटी थ्री हे चित्रपट जे क्रिकेटवर आधारित आहेत ते लवकरच प्रदर्शित होत आहेत. क्रिकेट हा फक्त सुदृढ व्यक्तींचाच खेळ राहिलेला नाही तर अंध, दिव्यांग क्रीडापटूही या खेळाचा आनंद घेतात. अपंगांचीसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेतली जाते. त्यात भारतीय संघ प्रत्येक वर्षी सहभागी होत असतो. शिर्डी साईबाबा फाऊंडेशन ही आशिम खेत्रपाल यांची संस्था आहे जी अपंग क्रिकेटपटूंना खेळाला आवश्यक असे साहित्य पुरवत असते. या स्नेहातूनच महत्त्वाकांक्षा, चिकाटी बाळगुण असणारे क्रिकेटपटू त्यांच्या सान्निध्यात आले.

रवी चौहाण हा त्यापैकी एक अपंग क्रिकेटपटू आहे जो मूळचा हरियाणाचा आहे. त्याच्या जीवनावर आधारित जज्बा- युवर विकनेस इज युवर स्ट्रेन्थ या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवलेले आहे. याकामी गौरव जैन यांचेसुद्धा सहकार्य लाभणार आहे. पुढल्या महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ होईल. त्याचा मुहूर्त ट्विंकल वशिष्ठ, आरती खेत्रपाल, सार्थक कपूर, गोविंद नामदेव, गजेंद्र चव्हाण, अखिलेंद्र मिश्रा, अमित पचोरी यांच्या उपस्थितीत झाला. अपंगत्व ही तुमची कमजोरी नव्हे तर तुमची ताकद आहे असे काहीसे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होणार आहे. आशिम खेत्रपाल हे निर्मितीबरोबर कलाकार म्हणूनही यात काम करणार आहेत. विकास कपूर आणि सुनिल प्रसाद हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. खेळ म्हटला की चेतना देणारे गीत हे प्रत्येक चित्रपटात अपेक्षित असते. शेखर अस्तित्वा यांच्या गीताला अमर प्रभाकर देसाई यांनी संगीतबद्ध केलेले आहे. सुखविंदर सिंग यांच्या आवाजात हे गाणं ध्वनीमुद्रीत करण्यात आलेले आहे. रवीबरोबर कर्तृत्व सिद्ध करणार्‍या अन्य क्रिकेटपटूंचाही या चित्रपटात मागोवा घेतला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -