घरमनोरंजन२४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम; शिल्पाने घेतला आस्वाद

२४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम; शिल्पाने घेतला आस्वाद

Subscribe

फिटनेस आणि परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाणारी शिल्पा आता तिच्या खाण्यावरील प्रेमामुळेही सोशल मीडियावर फेमस होऊ लागली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शिल्पा शेट्टीचं खाण्याप्रती असलेलं प्रेम सर्वांनाचा ठाऊक आहे. घरी बनवलेले किंवा बाहेर मिळणारे वेगवेगळे आणि विशिष्ट खाद्यपदार्थ चाखून, त्याविषयीची माहिती शिल्पा आपल्या फॅन्सना देत असते. इतकंच नाही तर शिल्पा जेव्हा अन्य देशांमध्ये जाते तेव्हा त्या-त्या देशातील काही खास व्यंजनं ती आवर्जून चाखते आणि त्याचा एक व्हिडिओ बनवून त्याद्वारे त्या पदार्थांची माहिती फॅन्सपर्यंत पोहोचवते. शिल्पाचा असचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये शिल्पा एक चवदार आईस्क्रीम खाताना आणि सोबतच त्याची माहिती देताना दिसते आहे. हे आईस्क्रीम साधसुधं नसून या आईस्क्रीमवर चक्क २४ कॅरेट सोन्याचा वर्ख चढवण्यात आला आहे. शिल्पा या सोनाच्या आईस्क्रीमचा मनमुराद आस्वाद घेताना व्हिडिओत दिसते आहे. फिटनेस आणि परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाणारी शिल्पा आता तिच्या खाण्यावरील प्रेमामुळेही सोशल मीडियावर फेमस होऊ लागली आहे. दरम्यान, शिल्पाने खाल्लेल्या या ‘सोन्याच्या’ आईस्क्रीमविषयी आता जगभरातील लोकांची उत्सुकता वाढू लागली आहे. इन्स्टाग्रामवर जगभरातील लोकांनी या ‘२४ कॅरेट’ आईस्क्रीमच्या व्हिडिओवर कमेंट्सची बरसात केली आहे.

कुठे मिळतं हे आईस्क्रीम?

२४ कॅरेट सोन्याचा वर्ख चढवलेलं हे आईस्क्रीम हाँगकॉंगच्या एका आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं. सध्या हाँगकाँग दौऱ्यावर असलेल्या शिल्पाने हे भन्नाट आईस्क्रीम खाल्लं असून, त्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. शिल्पा तिचा पती राज कुंद्रा आणि मुलासोबत हाँगकाँगमध्ये हॉलीडे एन्जॉय करण्यासाठी गेल्याचं समजतंय. शिल्पाला डेसर्ट अर्थात गोड पदार्थ खाण्याची खूपच आवड असल्याचं तिने वेळोवेळी तिच्या व्हिडिओजमधून सांगितलं आहे. या व्हिडिओतही सोन्याचं गोडगोड आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद स्पष्ट दिसतो आहे.


वाचा: कब आएंगे फोटो? विनोदी Memes ने दीप-वीर ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -