Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लडाखमधल्या थंडीत बिग बींची हाडं गोठली, केलं पॅकअप

लडाखमधल्या थंडीत बिग बींची हाडं गोठली, केलं पॅकअप

Related Story

- Advertisement -

भारताच्या उत्तरेला कडाक्याची थंडी पडली आहे. लडाखमध्ये अक्षरशः हाडं गोठणारी थंडी आहे. यादरम्यान बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन आगामी चित्रपटांची शूटिंग करण्यासाठी लडाखमध्ये गेले होते. पण तिथल्या कडाक्याच्या थंडीमुळे अमिताभ बच्चन यांना शूटिंग थांबावून माघारी यावे लागले आहे. त्यांनी याबाबत स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी वयाचे ७०वे वर्ष ओलांडले तरी ते त्याच जोमाने आणि उत्साहाने काम करत असतात. सोशल मीडियावर ते खूप सक्रिय असतात. जेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा देखील सकारात्मक ट्विट ते नेहमी करत असायचे. आता देखील अमिताभ बच्चन यांनी लडाखमधील थंडीचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला असून यामध्ये ते स्नो गॉगल, थर्मल सूट आणि हँड ग्लोज घातलेले दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘लडाखला गेलो होते, परंतु लगेचच माघारी यावे लागले. इथे ३३ अंश सेल्सियस तापमान असून मी थर्मल सूट घातला आहे. पण हा सूट मला थंडीपासून वाचवू शकला नाही आहे.’

- Advertisement -

दरम्यान लवकरच बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या दिग्दर्शनखाली ‘मेडे’ या चित्रपटात अमिताभ बच्चन दिसणार आहेत. या चित्रपटामुळे बऱ्याच काळानंतर अमिताभ बच्चन आणि अजय देवगण काम करणार आहेत. तसेच रणबीर कपूरसोबतच्या ‘ब्रम्हास्त्र’मध्ये देखील अमिताभ बच्चन झळकणार आहेत.


- Advertisement -

हेही वाचा –  अनुष्काची सटकली, विराटबरोबरचा खासगी फोटो व्हायरल


 

- Advertisement -