घरफिचर्सFacebook Live : 'वच्छी आत्या'शी मनमोकळ्या गप्पा

Facebook Live : ‘वच्छी आत्या’शी मनमोकळ्या गप्पा

Subscribe

वादळवाट, घाडगे आणि सून, मालवणी डेज, नकटीच्या लग्नाला सावधान आणि नांदा सौख्य भरे अशा अनेक मालिकांमधून दमदार अभिनय केलेल्या अभिनेत्री वर्षा धांदळे आज माय महानगरच्या न्यूजरुममध्ये आल्या होत्या. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘वच्छी आत्या’ घराघरांत पोहोचली. वच्छी आत्यावर उभ्या महाराष्ट्राने प्रेम केलं आणि या भूमिकेमूळे वर्षा दांदळे यांनाही अभिनेत्री म्हणून एक वेगळी ओळख मिळाली. आजही मराठी प्रेक्षकांच्या मनामनात असलेल्या वच्छी आत्याविषयी आणि आपल्या अभिनय क्षेत्रातील अनुभवांविषयी वर्षा दांदळे भरभरुन बोलल्या. माय महानगरच्या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात सहभागी होत, त्यांनी या सर्व आठवणींना उजाळा दिला. तसंच माय महानगरच्या Facebook Live च्या माध्यमातून प्रेक्षकांशीही संवाद साधला. पाहा, काय म्हणाल्या वच्छी आत्या अर्थात अभिनेत्री वर्षा दांदळे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -